Suyash Tilak : उत्तम अभिनेता, अप्रतिम फोटोग्राफर ते सोशल मीडियाला गुडबाय; वाचा ‘सुयश’ टिळकची कहाणी!

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुयश टिळक बराच चर्चेत आहे. (Best Actor, Awesome Photographer to Goodbye to Social Media; Read 'Suyash' Tilak's story!)

Suyash Tilak : उत्तम अभिनेता, अप्रतिम फोटोग्राफर ते सोशल मीडियाला गुडबाय; वाचा 'सुयश' टिळकची कहाणी!
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 12:56 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) बराच चर्चेत आहे. आधी ब्रेकअपची चर्चा, नंतर सोशल मीडियाला गुडबाय म्हणणारा सुयश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ते म्हणजे सुयश टिळकचा कार अपघात, सुयश ज्या गाडीतून प्रवास करत होता, त्या गाडीचा मोठा अपघात झाल्यानं सुयश आता चर्चेत आला आहे. रविवार 28 फेब्रुवारीला पहाटे सुयश स्वतःच्या गाडीनं न जाता कॅबनं प्रवास करत होता. परंतु, रस्त्यावर अंधार असल्यानं मालवाहतूक करणाऱ्या गाडीने सुयश बसलेल्या कॅबला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, कॅब रस्त्याच्या कडेला उलटून पडली होती. या प्रवासा दरम्यान गाडीत ड्रायव्हर आणि सुयश दोघेच होते. (Best Actor, Awesome Photographer to Goodbye to Social Media; Read ‘Suyash’ Tilak’s story!)

सुयश टिळकचा मालिकांमधील प्रवास

सुयश टिळक हा उत्तम अभिनेता आहे त्यासोबतच तो अप्रतिम फोटोग्राफर आहे. त्यानं 2010 मध्ये झी मराठीवरील ‘अमरप्रेम’ या मालिकेतून टेलिव्हिजन क्षेत्रात पाऊल टाकलं. त्यानंतर स्टार प्रवाहवरील ‘बंध रेशनाचे’, ‘पुढचं पाऊल’, ‘दर्वा’, झी मराठीवरील ‘का रे दुरावा’ या मालिकेनं सुयशला चांगली ओळख निर्माण करुन दिली, कलर्स मराठीवरील ‘सख्या रे’, झी युवावरील ‘बाप माणुस’ या मालिकेत सुयश एका वेगळ्या अंदाजात झळकलाय, ‘एक घर मंतरलेलं’, ‘छोटी मालकीन’ आणि आता सुयश कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेतून शंतनूच्या भूमिकेत चाहत्यांची मनं जिंकतोय. या मालिकेत सुयश अभिनेत्री सायली संजीवसोबत काम झळकतोय.

सुयशचा चित्रपटांमधील प्रवास

मालिकांप्रमाणेच सुयशनं चित्रपटसृष्टीवरही आपली वेगळी छाप मारली आहे. मराठी सोबतच त्यानं बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. ‘भाकरखाडी 7 किमी’, ‘क्लासमेट’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘तिचा उंबरठा’, ‘ दिवस हा माझा’ आणि बॉलिवूडमधील ‘खाली पिली’ या चित्रपटांमधून सुयशचा चांगला फॅनफॉलोईंग तयार झालाय.

‘या’ अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंधाची चर्चा

तर कलाकारांच्या नात्याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. सुयश टिळक आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री अक्षया देवधर या दोघांच्या नात्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. हे दोघं रिलेशनशीपमध्ये असल्यापासून ते त्यांच्या ब्रेकअपपर्यंत अनेक गोष्टी समोर आल्या. मात्र लाँग डिस्टंस रिलेशनशीप वर्क न झाल्यानं दोघांना विभक्त व्हावं लागल्याचीही चर्चा आहे. आता दोघंही आपआपल्या आयुष्यात आनंदी असल्याचं चित्र आहे.

सोशल मीडियाला ‘रामराम’ मात्र परत एंट्री

अभिनेता सुयश टिळक हा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होत असतो. मात्र अचानक सुयशनं सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. इन्स्टाग्रामवर खलील जिब्रानचं एक कोट पोस्ट करत सुयशनं हा निर्णय चाहत्यांना सांगितला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. मात्र आता सुयशनं सोशल मीडियावर आता परत एंट्री केली.

संबंधित बातम्या

Suyash Tilak | कॅबला मालवाहू कंटेनरची जोरदार धडक, अभिनेता सुयश टिळक थोडक्यात बचावला!

Bigg Boss : ज्यांना दिल्या शिव्या त्यांच्याच सोबत राखी सावंतची पार्टी, शो स्क्रिप्टेड असल्याची चर्चा!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.