19 वर्षांच्या संसारानंतर ‘अंगुरी भाभी’चा घटस्फोट; दुसऱ्या लग्नाविषयी शुभांगी अत्रे म्हणाली…

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेने 2003 मध्ये पियुष पूरेशी इंदूरमध्ये लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून शुभांगी आणि पियुष वेगवेगळे राहत होते. आता घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाविषयी काय विचार आहे, याबद्दल शुभांगी व्यक्त झाली.

19 वर्षांच्या संसारानंतर 'अंगुरी भाभी'चा घटस्फोट; दुसऱ्या लग्नाविषयी शुभांगी अत्रे म्हणाली...
Shubhangi AtreImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 3:36 PM

मुंबई : 14 डिसेंबर 2023 | ‘भाभीजी घर पर है’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र अंगुरी भाभी ही भूमिका विशेष गाजली. मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे घराघरात लोकप्रिय झाली. तिने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मालिकेत सर्वांना हसवणारी शुभांगी तिच्या खासगी आयुष्यात मात्र एकटी आहे. 42 वर्षीय शुभांगी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पतीसोबत तुटलेल्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

शुभांगी अत्रेने कमी वयातच लग्न केलं होतं. वयाच्या 20 व्या वर्षी तिने पियुष पुरेशी लग्न केलं आणि आता लग्नाच्या 19 वर्षांनंतर दोघं विभक्त झाले. शुभांगीने घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. हा संपूर्ण काळ भावनिकदृष्ट्या अनेक चढउतारांचा होता, असं शुभांगी म्हणाली. वैवाहिक आयुष्यातील समस्यांना सामोरं गेल्यानंतर पुन्हा कधी कोणावर प्रेम करू शकेन असं मला वाटत नाही, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा

“माझ्याने आता पुन्हा प्रेम होणारच नाही. प्रेमाच्या कोणत्याही नात्यासाठी मी माझ्या आयुष्यातील सर्व मार्ग बंद केले आहेत. माझं लग्न कमी वयात झाल्याने मी आईसुद्धा लवकर झाले होते. आता माझी मुलगी 18 वर्षांची असून ती अमेरिकेत शिक्षण घेत आहे. माझी मुलगीच माझी सर्वांत चांगली मैत्रीण आहे. तिच्याकडून मलाही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात”, असं शुभांगीने सांगितलं.

“जवळपास वर्षभरापासून आम्ही एकत्र राहत नाही. आमचा संसार वाचवण्यासाठी पियुष आणि मी खूप प्रयत्न केले. एकमेकांचा आदर, साथ, विश्वास आणि मैत्री हे मजबूत लग्नाचा पाया असतात. मात्र जसजशी वेळ पुढे निघून गेली, तसतसं आम्हाला समजलं की आम्ही एकमेकांमधील वाद मिटवू शकत नाही आहोत. म्हणूनच आम्ही दोघांनी एकमेकांना पुरेसा वेळ देण्याचा निर्णय घेतला”, असं शुभांगी म्हणाली.

शुभांगीने एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी के’ या मालिकेतून करिअरची सुरुवात केली. या मालिकेत तिने पलचीन बासूची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने ‘कस्तुरी’ आणि ‘दो हंसो का जोडा’ यांसारख्या मालिकेत काम केलं होतं. ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतील अंगुरी भाभीच्या भूमिकेमुळे शुभांगीला आणखी लोकप्रियता मिळाली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.