‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्याचं निधन; डुप्लीकेट अमिताभ बच्चन म्हणून ठरला लोकप्रिय

'भाभीजी घर पर है' या मालिकेत भूमिका साकारलेले अभिनेते फिरोज खान यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. फिरोज हे अमिताभ बच्चन यांची नक्कल करण्यासाठी लोकप्रिय होते. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्याचं निधन; डुप्लीकेट अमिताभ बच्चन म्हणून ठरला लोकप्रिय
अभिनेते फिरोज खानImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 23, 2024 | 1:56 PM

उत्तरप्रदेशमधील बदायूं इथं राहणारे प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेते फिरोज खान यांचं निधन झालं आहे. गुरुवारी 23 मे रोजी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका झाला. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. फिरोज खान यांना अमिताभ बच्चन यांचे डुप्लीकेट म्हटलं जायचं. ते हुबेहूब बिग बींसारखी नक्कल आणि अभिनय करायचे. यामुळे चाहत्यांमध्ये ते ‘फिरोज खान अमिताभ डुप्लीकेट’ नावाने लोकप्रिय होते. त्यांनी आजवर बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘भाभीजी घर पर है’, ‘जीजा जी छत पर है’, ‘साहब बीबी और बॉस’, ‘हप्पू की उलटन पलटन’ आणि ‘शक्तीमान’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय. याशिवाय गायक अदनान सामीच्या सुपरहिट ठरलेल्या ‘थोडी सी तू लिफ्ट करा दे’ या गाण्यातही ते झळकले होते.

फिरोज खान हे गेल्या काही दिवसांपासून बदायूंमध्येच राहत होते. तिथे राहून ते विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेत होते. सोशल मीडियावरही त्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात. फिरोज यांनी 4 मे रोजी बदायूंमध्ये एका मतदार महोत्सवात शेवटचं परफॉर्म केलं होतं. त्यांच्या परफॉर्मन्सला प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली होती. त्यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर फिरोज खान यांचा मोठा चाहतावर्ग आहे. दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांसारखे सेलिब्रिटीसुद्धा त्यांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. इन्स्टाग्रामवर त्यांच्या फॉलोअर्सचा आकडा लाखोंमध्ये आहे.

हे सुद्धा वाचा

अमिताभ बच्चन यांची नक्कल करण्यासाठी ओळखले जाणारे फिरोज खान यांनी त्यांच्या शेवटच्या परफॉर्मन्समध्येही बिग बींचीच मिमिक्री केली होती. त्यांचे प्रसिद्ध डायलॉग्स बोलून त्यांनी मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित केलं होतं. फिरोज खान हे बिग बींशिवाय दिलीप कुमार, शाहरुख खान, धर्मेंद्र आणि सनी देओल यांचीसुद्धा मिमिक्री करायचे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.