Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘स्पष्ट पुरावे मिळूनही अद्याप कारवाई का नाही?’; बहिणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर भाग्यश्री मोटेचा संताप

'एका सामान्य व्यक्तीप्रमाणे मी कारवाईचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र मला कोणतंही स्पष्ट उत्तर मिळालं नाही. मी माझ्या बहिणीसाठी न्यायाची मागणी करते', अशी विनंती तिने या पोस्टद्वारे केली आहे.

'स्पष्ट पुरावे मिळूनही अद्याप कारवाई का नाही?'; बहिणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर भाग्यश्री मोटेचा संताप
Bhagyashree Mote with sisterImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 2:31 PM

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीच्या संशयास्पद मृत्यूने पुणे हादरलं. भाग्यश्रीची बहीण मधू मार्कंडेयचा मृतदेह पिंपरी-चिंचवडमधील वाकड इथं आढळला होता. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र कोणतीच ठोस कारवाई का झाली नाही, असा सवाल आता भाग्यश्रीने केला आहे. भाग्यश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर याविषयी भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे तिने बहिणीच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचप्रमाणे न्यायाची मागणी केली आहे. मधू मार्कंडेयच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा आढळल्या होत्या. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. मधू ही भाग्यश्रीची मोठी बहीण होती.

भाग्यश्री मोटेची पोस्ट-

‘हे कोणाला धमकी देण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी नाही. फक्त आमच्याकडून सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 12 मार्च (रविवार) रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास माझी बहीण केक वर्कशॉप घेण्यासाठी गेली होती. केक बनवण्याचं सामान, दोन बेक केलेले केकचे बेस यांच्यासह तिच्यासोबत एक महिला होती. त्या महिलेला ती फक्त गेल्या तीन-चार महिन्यांपासून ओळखते. आमच्या माहितीप्रमाणे ती पाच महिलांचा वर्कशॉप घेणार होती’, असं तिने लिहिलं.

हे सुद्धा वाचा

पुढे तिने म्हटलंय, ‘आता तीच महिला आम्हाला असं सांगतेय की त्या दोघी एक खोली पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना रस्त्यावर एक रुमसाठीचा एक पॅम्फ्लेट सापडला आणि त्यानंतर त्यांनी मालकाला फोन केला. मालकाची भेट घेतल्यानंतर त्यांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली आणि अचानक माझी बहीण कोसळली. त्यानंतर त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. खासगी रुग्णालयाने तिला दाखल करण्यास नकार दिला, तेव्हा तिला व्हायसीएममध्ये दाखल करण्यात आलं. तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी तिला तासाभरापूर्वीच मृत झाल्याचं घोषित केलं.’

‘माझी बहीण ही केक वर्कशॉपसाठीच गेली होती याचे स्पष्ट पुरावे आहेत. एक दिवस आधी तिला त्यासाठी अॅडव्हान्स मिळाला होता. तिच्या चेहऱ्यावर नखांच्या खुणा होत्या आणि त्याला डॉक्टरांनीही दुजोरा दिला. तिच्यासोबत जे काही घडलं ते सर्व संशयास्पद होतं. ज्याठिकाणी ते गेले होते, तिथे लोकांची फार गर्दी नसते. त्या संपूर्ण कॉलनीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा नाहीत. माझ्या बहिणीने एक खोली भाड्याने घेतली होती आणि बिझनेससाठी एक ऑफिससुद्धा होतं. आर्थिक मदतीसाठी तिने वर्कशॉपची ऑर्डर घेतली होती’, हे भाग्यश्रीने स्पष्ट केलं.

‘इतक्या दिवसांनंतरही कोणतंही ठोस पाऊल का उचललं गेलं, कोणतीच कारवाई का झाली नाही हे मला समजत नाही. चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवली जातेय. एका सामान्य व्यक्तीप्रमाणे मी कारवाईचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र मला कोणतंही स्पष्ट उत्तर मिळालं नाही. मी माझ्या बहिणीसाठी न्यायाची मागणी करते’, अशी विनंती तिने या पोस्टद्वारे केली आहे.

ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....