कोट्यवधींचं ऑफिस घेतल्यानंतर भारती सिंहला आला या गोष्टीचा राग; म्हणाली ‘तोडून टाकेन सगळं..’
कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया हे त्यांच्या युट्यूब चॅनलवर व्लॉग्स पोस्ट करत असतात. नुकत्याच एका व्लॉगमध्ये भारतीने तिचं नवीन ऑफिस दाखवलं आहे. मात्र या व्हिडीओमध्ये ती पती हर्षला थेट इशारासुद्धा देताना दिसतेय.
कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय जोडी आहे. या दोघांचा एक युट्यूब चॅनल असून त्यावर ते विविध व्लॉग पोस्ट करत असतात. हर्ष आणि भारती त्यांच्या रोजच्या आयुष्यातील अपडेट्स या व्लॉगद्वारे चाहत्यांना देतात. नुकतंच भारतीने एका व्लॉगमध्ये सांगतिलं की तिने नवीन ऑफिस विकत घेतलं आहे. हर्षसोबत ती तिचं नवीन ऑफिस बघायला पोहोचली होती. “ऑफिस खरेदी केल्यानंतर आता पहिल्यांदाच मी बघायला जातेय”, असं ती या व्हिडीओमध्ये म्हणते. त्यानंतर ती पती हर्षला एक इशारासुद्धा देते.
“जर मला ऑफिस आवडलं नाही तर मी संपूर्ण ऑफिस तोडून टाकेन. ऑफिसवर बुलडोजर चालवेन आणि त्यानंतर संपूर्ण ऑफिस नव्याने पुन्हा बनवेन”, असा थेट इशाराच ती हर्षला देते. यानंतर व्हिडीओद्वारे ती चाहत्यांना संपूर्ण ऑफिस दाखवते. ऑफिसला पोहोचताच भारतीचा राग पूर्णपणे शांत होतो. “हे ऑफिस ड्युप्लेक्स (दुमजली) असून त्यात बरेच रुम्स आहेत. आमच्या दोघांच्या मेकअप आणि स्टायलिंगसाठी एक खास रुम आहे”, असंही ती सांगते.
हर्ष आणि भारती हे दोघं कॉमेडियन्स असून त्यांनी अनेक शोजचं सूत्रसंचालन केलंय. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोमध्ये भारती सेकंड रनर अप ठरली होती. त्यानंतर तिने ‘कॉमेडी सर्कस’मध्ये भाग घेतला. भारतीने कृष्णा अभिषेकसोबत मिळून ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ या शोचं सूत्रसंचालन केलं होतं. 3 डिसेंबर 2017 रोजी तिने हर्ष लिंबाचियाशी लग्न केलं.
पहा व्हिडीओ
भारती आणि हर्षचं ‘LOL (लाइफ ऑफ लिंबाचियास)’ या नावाने युट्यूब चॅनल आहे. त्यावर ते विविध व्हिडीओ पोस्ट करत असतात. हर्ष आणि भारतीच्या व्हिडीओंना लाखोंमध्ये व्ह्यूज मिळतात. या दोघांना एक मुलगा असून तोसुद्धा या व्हिडीओमध्ये दिसून येतो. एप्रिल 2022 मध्ये भारतीने मुलाला जन्म दिला. भारतीकडे जवळपास 23 कोटी रुपयांची संपत्ती आहे. भारतीचं शूटर बनण्याचं स्वप्न होतं. कॉलेजमध्ये असताना शूटिंगमध्ये तिने सुवर्णपदक मिळवलं होतं. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने तिने तिचं स्वप्न सोडून दिलं. भारतीला आता शोचं सूत्रसंचालन करण्यासाठी सहा ते सात लाख रुपये मानधन मिळतं.