Drug Case | चॅनेलच्या भूमिकेच्या विरोधात ‘द कपिल शर्मा शो’ची टिम, भारतीवरील बंदी उठवण्याची मागणी!
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Bharati Singh)आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया हे गेल्या काही दिवसांपासून ड्रगच्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत.
मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Bharati Singh)आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया हे गेल्या काही दिवसांपासून ड्रगच्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. भारतीला सोशल मीडियावर चाहत्यांच्या रोषाला सोमोरे जावे लागत आहे सर्व स्तरातून भारतीवर आता टिका होऊ लागली आहे. ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळे सोनी टीव्हीने भारतीची ‘द कपिल शर्मा शो’मधूनही हकालपट्टी केल्याचे कळते आहे. मात्र, सोनी टीव्हीचा हा निर्णय कपिल शर्मा आणि त्यांच्या टिमला मान्य नाही.(Bharti singh being dropped from the kapil sharma show)
कपिलच्या कॉमेडी शोमध्ये काम करणारा किकू शारदा म्हणतो की, ‘आम्ही काल शूट केले आणि भारती आमच्या शूटिंगसाठी हजर नव्हती. पण भारती ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये नसणार याच्या बद्दल कोणालाही काहीही माहिती नाही. आणि ती काल शूटवर हजर नव्हती कारण, भारतीचे काही शूट नव्हते आणि कपिल शर्माच्या शोचा भाग भारती नसणार अशा कुढल्याच निर्णया बद्दल माहिती नाही.’ आता, भारती कपिल शर्माच्या शोमध्ये कधीही दिसणार नाही. केवळ कपिल शर्मा शोमध्येच नाही तर, भारती आणि तिचा नवरा सोनीच्या कोणत्याही शोमध्ये भाग घेऊ शकत नाहीत. या निर्णयामुळे भारतीचा खास मित्र, अभिनेता कपिल शर्मा चिडला असल्याचे कळते आहे. कपिलचे म्हणणे असे आहे की, सोनी टीव्हीने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये भारतीवर बंदी घालू नये. सोनी टीव्ही नेहमीच त्यांच्या चॅनेलची प्रतिमा “स्वच्छ” राखण्याचा प्रयत्न करते. त्यांचा विश्वास आहे की, सोनी टीव्ही एक फॅमिली चॅनेल आहे आणि कपिल शर्मा शो हा फॅमिली शो आहे. त्यामुळे या शोमध्ये कोणत्याही वादग्रस्त व्यक्तींनी सहभागी नसावे, अशी चॅनेलची भूमिका आहे. कपिल शर्माच्या अडचणीच्या वेळी भारती सिंगने नेहमीच त्याला पाठिंबा दिला आहे. अलीकडे, जेव्हा कपिल आजारी पडला होता आणि त्याचा परिणाम त्यांच्या शोवर होत होता. त्यावेळी भारतीने त्याची मदत केली होती. कपिल आणि भारती दोघेही पंजाबचे आहेत. कपिल भारतीला त्याची छोटी बहीण मानतो. त्यामुळे अशा प्रकारच्या अडचणीच्या वेळी हा शो भारतींकडून काढून घेतला जाऊ नये, अशी त्याची इच्छा आहे. सोनी टीव्हीने एखाद्या कलाकाराशी बंदी घालण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वीसुद्धा सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनु मलिकवर अनेक सेलिब्रिटींनी ‘मीटू’ आरोप केले तेव्हा, सोनी टीव्हीने त्यांना चॅनलमधून बाहेरचा मार्ग दाखविला होता. एनसीबीने शनिवारी (21 नोव्हेंबर) खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले होते. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले होते. यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला होता. भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली.
संबंधित बातम्या :
Bharti Singh | भारती सिंहची ‘द कपिल शर्मा शो’मधून हाकलपट्टी? वाचा कृष्णा अभिषेक काय म्हणाला…
Drugs Case | ड्रग्ज प्रकरणी एनसीबी अधिकारी भारती सिंहच्या कर्मचार्यांचीही चौकशी करू शकतात!
(Bharti singh being dropped from the kapil sharma show)