“घरातलेही सुनवायचे, कधी एक पराठा जास्त खाल्ला तर..”; भारती सिंगला अश्रू अनावर

स्थूलपणावरून टोमणे मारणाऱ्यांबद्दल बोलताना भारती सिंग झाली भावूक

घरातलेही सुनवायचे, कधी एक पराठा जास्त खाल्ला तर..; भारती सिंगला अश्रू अनावर
Bharti SinghImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 19, 2022 | 11:44 AM

मुंबई: मलायका अरोराच्या ‘मूव्हिंग इन विद मलायका’ या शोमध्ये नुकतीच कॉमेडियन भारती सिंगने हजेरी लावली. या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. मलायकाची पाहुणी बनलेल्या भारतीने या एपिसोडमध्ये ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला. मलायकाचं वय, कपडे आणि खासगी आयुष्यावरून ट्रोल करणाऱ्यांना भारतीने सडेतोड उत्तर दिलं. मात्र नेहमीच सर्वांना हसविणारी भारती या शोमध्ये भावूकही झाली. मलायकाने जेव्हा तिच्या स्थूलपणावरील कमेंट्स वाचले, तेव्हा भारती भावूक झाली.

वजनावरून कुटुंबीय मारायचे टोमणे

मलायकाशी बोलताना भारतीने सांगितलं की कशा पद्धतीने लोक तिच्या स्थूलपणावरून ट्रोल करायचे. अनेकदा कुटुंबीयच त्यावरून टोमणे मारायचे, असं ती म्हणाली. “बाहेरचेच लोक नाही तर घरच्यांनीही मला ट्रोल केलंय. मी खूप टोमणे ऐकले आहेत. कधी जेवताना एक पराठा जास्त खाल्ला तर घरातले लगेच म्हणायचे की बस कर, मुली इतकं खात नाहीत. तुझं लग्न होणार नाही”, असं म्हणताना भारती भावूक झाली.

हे सुद्धा वाचा

मलायकाही झाली भावूक

भारती पुढे म्हणाली, “माझ्या रोकाच्या कार्यक्रमाचे फोटो जेव्हा मी शेअर केले, तेव्हा लोकांनी खूप ट्रोल केलं. अरे साईज बघितलीस का स्वत:ची, असं लोक म्हणायचे. हत्ती आणि मुंगीची ही खरी जोडी आहे, अशीही खिल्ली उडवली. लग्नाबद्दल लोक शुभेच्छा देतात. पण मला असे कमेंट्स ऐकायला मिळाले. हर्षलाही लोकांनी खूप टोमणे ऐकवले.” भारतीचं हे ऐकून मलायकाच्या डोळ्यात अश्रू आले.

“तू मलायकाचा बाप आहेस का?”

“एक शो असा असला पाहिजे, ज्यामध्ये ट्रोलर्सना समोर बसवलं पाहिजे, जेणेकरून तोंडासमोर त्यांना उत्तर देऊ शकू”, असंही भारती म्हणाली. मलायकाने ट्रोलर्सचे काही कमेंट्स भारतीसमोर वाचून दाखवले. त्यावर तिने उत्तरंसुद्धा दिली. ‘तू कशा प्रकारचे कपडे घालतेस’, अशी एक कमेंट मलायकाने वाचून दाखवली. त्यावर भारतीने सुनावलं, “तू काय मलायकाचा बाप आहेस का? तिच्या मर्जीनुसार तिने कोणतेही कपडे परिधान करावेत. हे तिचं शरीर आहे. कधी बारिक दिसणाऱ्यांवर कमेंट्स तर कधी जाड दिसणाऱ्यांना टोमणे.. तुम्हाला कामधंदे नाहीत का?”

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.