भारती सिंह ही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच मोठी शस्त्रक्रिया ही भारती सिंह हिच्यावर झाली. भारती सिंह आपल्या खासगी आयुष्याबद्दल प्रत्येक अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. आता नुकताच एक मोठे गिफ्ट भारती सिंह हिने जस्मिन भसीन हिला दिले आहे. जस्मिन ही कायमच भारती सिंहच्या घरी येताना दिसते. फक्त जस्मिन भसीन हिच नाहीतर तिचा बॉयफ्रेंड अली गोनी हा देखील भारती सिंहच्या घरी येतो. त्यांच्यामध्ये खास मैत्री बघायला मिळते. आता नुकताच जस्मिन भसीनचा वाढदिवस झालाय. .
जस्मिन भसीन हिने अली गोनी याच्यासोबत वाढदिवस साजरा केला. जस्मिन भसीनच्या वाढदिवसाचा खास व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. जस्मिन भसीन हिला वाढदिवसाचे खास सरप्राईज अली गोनी याने दिल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. दोघेच वाढदिवस खास ठिकाणी साजरा करताना दिसत आहेत.
आता नुकताच जस्मिन भसीन ही लाफ्टर शेफ्सच्या सेटवर पोहोचली. यावेळी भारती सिंह हिने जस्मिन भसीनला लाखोंची किंमत असलेले बर्थडे गिफ्ट दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. याचा व्हिडीओ भारती सिंहने शेअर केलाय. विशेष म्हणजे हे गिफ्ट जस्मिन भसीन हिला प्रचंड आवडल्याचे देखील बघायला मिळतंय.
गिफ्ट देताना भारती सिंह ही म्हणाली की, जस्मिन आमच्यासाठी खास मुलगी आहे, ती वेगळी मुलगी आहे, ती एक खास मैत्रीण आहे. ज्यावेळी जस्मिन भसीन हे गिफ्ट ओपन करते, त्यावेळी तिला मोठा धक्का बसतो. लाखोंच्या घरात किंमत असलेली पर्स भारती सिंह ही जस्मिन भसीनला देताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच जस्मिन भसीन हिने देखील सोन्याचे एक महागडे गिफ्ट भारती सिंहला गिफ्ट म्हणून दिले होते. जस्मिन भसीन हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. विशेष म्हणजे जस्मिन भसीनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. जस्मिन भसीन ही सोशल मीडियावर सक्रिय देखील दिसते.