अनन्या पांडेच्या अफेअर्सना कंटाळली आई? म्हणली, ‘जेव्हा हिचं लग्न होईल…’

Ananya Panday Relationship: अनन्या पांडेचे अनेक सेलिब्रिटींसोबत प्रेमसंबंध, अभिनेत्रीच्या अफेअर्सना कंटाळली आई? लेकीच्या खासगी आयुष्याबद्दल केलं मोठं वक्तव्य, अनन्या कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

अनन्या पांडेच्या अफेअर्सना कंटाळली आई? म्हणली, 'जेव्हा हिचं लग्न होईल...'
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 10:02 AM

Ananya Panday Relationship: अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनन्या हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून अनन्या तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अनेक सेलिब्रिटींसोबत अनन्या हिच्या नावाची चर्चा देखील रंगलेली असते. यावर अनन्या हिच्या आईने मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय अनन्याच्या लग्नाबद्दल देखील खुलासा केला आहे.

अनन्या पांडे हिने ईशान खट्टर, कार्तिक आर्यन आणि आदित्य रॉय कपूर आणि मॉडेल वॉल्कर ब्लान्को यांना डेट केलं आहे. अनेकांसोबत अभिनेत्रीच्या नावाची चर्चा रंगली. यावर अनन्याची आई भावना पांडे हिला प्रश्न विचारण्यात आला. ‘मुलीच्या अफेअर्सचा तुला कधी त्रास झाला नाही?’

View this post on Instagram

A post shared by Ananya 🌙 (@ananyapanday)

यावर भावना पांडे म्हणाली, ‘मी माझ्या मुलीला पूर्ण सपोर्ट दिला आहे. कोणासोबत तिच्या नावाची चर्चा होत आहे याच्याशी मला काहीही फरक पडत नाही. जेव्हा मी तरुण होती, तेव्हा माझं देखील नाव अनेकांसोबत जोडण्यात आलं. फक्त हेडलाईन्ससाठी सर्व काही केलं जातं.’

‘मला असं वाटतं की तिने स्वतःचं आयुष्य तिच्या अटींवर जगावं… ज्या दिवशी अनन्या लग्न करण्याचा निर्णय घेईल त्या दिवशी मी भावूक होईल. पण लग्न होईपर्यंत अनन्याने आयुष्य जगावं असं मला वाटतं… तिने आयुष्यात धम्माल करावी अशी माझी इच्छा आहे…’ असं देखील भावना पांडे म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Ananya 🌙 (@ananyapanday)

सांगायचं झालं तर, भावना पांडे सध्या नेटफ्लिक्सवरील ‘बॉलिवूड वाईव्स वर्सेस फॅब्यूलस लाइव्स’ शोमध्ये दिसत आहे. अनन्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिच्या देखील चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अनन्या कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.