सुंदरलाल नंतर आता ‘भिडे’ मास्तरलाही कोरोनाची लागण…
कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. देशभरातून कोरोनाचे हजारो केसेस समोर येत आहेत.
मुंबई : कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. देशभरातून कोरोनाचे हजारो केसेस समोर येत आहेत. बॉलिवूड आणि टीव्हीवरील अनेक सेलेब्स या कोरोना विषाणूच्या संसर्गाला बळी पडले आहेत. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) त्यानंतर आता टीव्ही सीरियल ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘भिडेची’ ची भूमिका साकारणार्या मंदार चांदवडकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. (Bhide mastar aka Mandar Chandwadkar tested corona positive)
या अगोदर मालिकेत सुंदरलालची भूमिका साकारणाऱ्या मयूर वाकानीला कोरोनाची लागण झाली होती आणि आता त्याचपाठोपाठ मंदार चांदवडकरला देखील कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नसल्यामुळे मंदार यांना होम क्वारंटाइन केले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. ‘ई टाइम्स’ शी बोलताना मंदार म्हणाले की, ‘हो, माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. पण मला कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत.
मी स्वत:ची काळजी घेत आहे. मला डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी मी करत आहे आणि सर्व नियमांचे पालन करत आहे. सध्या माझी प्रकृती स्थिर आहे. मालिकेत ‘दयाबेन’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वाकानी हिने 2017मध्ये या कार्यक्रमाला निरोप दिला होता. 4 वर्षे उलटून गेली, तरीही प्रेक्षक आतुरतेने दया बेन परत येण्याची वाट पाहत आहेत. नुकतीच टीएमकेओसीमध्ये अंजली भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुनयना फौजदारने दयाबेन जेठालालच्या जीवनात आणि गोकुळधाम सोसायटीत परत येण्याबद्दल काही खुलासे केले होते.
संबंधित बातम्या :
Video | जेव्हा ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदना शेतात नांगर चालवते, पाहा व्हिडीओ!
(Bhide mastar aka Mandar Chandwadkar tested corona positive)