झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. ज्या अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून भोजपुरी अभिनेत्री अन्नपूर्णा उर्फ अमृता पांडे आहे. अमृता पांडे हिचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. अभिनेत्रीच्या खोली तिचा मृतदेह आढळला आहे. संबंधीत घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. जोगसरच्या आदमपूर जहाज घाटात दिव्यधर्म अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये अमृता राहत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या साडीच्या मदतीने अमृता हिने स्वतःला संपवलं, ती साडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. शिवाय पोलिसांनी अभिनेत्रीचा मोबाईल देखील जप्त केला आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृताने प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव याच्यासह अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. तिने अनेक मालिका, वेब सिरीज आणि जाहिरातींमध्येही काम केले आहे.
अभिनेत्रीने स्वतःचं आयुष्य का संपवलं? याचा शोध पोलीस करत आहेत. शवविच्छेदनाचे रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण कळेल. मृत्यू पूर्वी अभिनेत्रीच्या व्हाट्सऍप स्टेटसने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ‘दो नाव पर सवार है उसकी जिंदगी, हमने अपनी नाव डूबा कर उसकी राह को आसान कर दिया.’ असं अभिनेत्री स्टेटस आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अभिनेत्रीच्या मृत्यू प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी अपार्टमेंटमध्ये एका महिलेने स्वतःला संपवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच एसएचओ कृष्ण नंदन कुमार सिंह, एसआय राजीव रंजन आणि शक्ती पासवान घटनास्थळी पोहोचले. फ्लॅटवर पोहोचल्यावर अमृताचा मृतदेह बेडवर पडलेला होता.
अभिनेत्री मृतदेह पाहिल्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आलं.