“दारू पाजून शारीरिक शोषण, मागितली माफी अन्..”; प्रसिद्ध अभिनेत्रीकडून पार्टनरवर गंभीर आरोप

प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांशु सिंहने पार्टनर पुनीतवर शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे. लग्नाचं आमिष दाखवून गेल्या दोन वर्षांपासून शोषण करत असल्याचा खुलासा तिने केला आहे. याप्रकरणी तिने पुनीतविरोधात तक्रार दाखल केली आहे.

दारू पाजून शारीरिक शोषण, मागितली माफी अन्..; प्रसिद्ध अभिनेत्रीकडून पार्टनरवर गंभीर आरोप
भोजपुरी अभिनेत्री प्रियांशु सिंहImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 12:32 PM

मुंबई | 4 सप्टेंबर 2023 : भोजपुरी संगीतविश्व आणि चित्रपटांमध्ये नाव कमावलेली अभिनेत्री प्रियांशु सिंह सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने सहअभिनेता आणि पार्टनर पुनीत सिंहवर लग्नाचं आमिष देऊन शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी प्रियांशुने पोलिसांत पुनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पुनीतने दोन वर्षांपर्यंत माझं शारीरिक शोषण केलं, असा आरोप तिने केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याचा खुलासा केला. “सतत लग्नाचं आमिष देऊन, बळजबरीने दारू पाजून पुनीतने माझं लैंगिक शोषण केलं. गेल्या दोन वर्षांपासून हे सर्व सहन करतेय”, असं प्रियांशुने म्हटलंय.

लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक शोषण

“पुनीत मला सतत म्हणायचा की आपण लवकरच लग्न करू. नंतर मला दारू पाजून माझं शारीरिक शोषण करायचा आणि दुसऱ्या दिवशी माफी मागायचा. जेव्हा मी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची धमकी दिली, तेव्हा तो म्हणाला की लग्नबद्दल कुटुंबीयांकडे विचारणा करेन. आपल्या दोघांची जात एकच आहे, त्यामुळे लग्नात कुटुंबीय कोणताच अडथळा आणू शकणार नाही, असं तो सतत मला म्हणायचा”, असं प्रियांशु म्हणाली.

गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार

प्रियांशु मुंबईत तिच्या बहिणीसोबत राहायची. तेव्हा पुनीत सतत तिच्या घरी यायचा. अनेकदा तो प्रियांशुकडे जेवायला जायचा आणि त्यादरम्यान दोघांची मैत्री झाली. जेव्हा प्रियांशुची बहीण घरातून निघून गेली, तेव्ही पुनीत दारूच्या नशेत तिच्या घरी जाऊ लागला. भोजपुरी इंडस्ट्रीत काम मिळावं यासाठी त्याने माझ्यासोबत मैत्री केली, असाही आरोप प्रियांशुने केला. मदतीचं आश्वासन दिल्यानंतर त्याने माझा गैरफायदा घेतला, असं तिने सांगितलं. 2021 मध्ये प्रियांशु आणि पुनीतची ओळख झाली आणि तेव्हापासून तो तिचं शारीरिक शोषण करतोय.

हे सुद्धा वाचा

पुनीतविरोधात कलम 376 आणि 377 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियांशु सिंह ही भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत बऱ्याच भोजपुरी चित्रपटांमध्ये आणि म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलं आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.