Bhuj The Pride Of India | ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटाचे शुटींग लवकरच सुरू होणार!

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन आणि संजय दत्त दिवाळीनंतर त्यांच्या आगामी ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाचे उर्वरीत शुटिंग पुर्ण करणार आहेत. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Bhuj The Pride Of India | ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटाचे शुटींग लवकरच सुरू होणार!
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 5:32 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगन आणि संजय दत्त दिवाळीनंतर त्यांच्या आगामी ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाचे उर्वरीत शूटिंग पूर्ण करणार आहेत. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण, संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा यांचा चित्रपट ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ यावर्षी प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले होते. आता या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा एकदा दिवाळीनंतर सुरू होणार आहे. (Bhuj The Pride Of India movie will start Shooting)

‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटाचे लॉकडाऊनच्या अगोदरच निम्म्याहून अधिक शूट पुर्ण झाले आहे. उर्वरीत शूटिंग आता अजय देवगन आणि संजय दत्त पुन्हा सुरू करणार आहेत. मिड-डेच्या वृत्तानुसार, 12 दिवसांच्या या वेळापत्रकात अजय देवगन, संजय दत्त, शरद केळकर आणि अ‍ॅमी विर्क अॅक्शन सीन शूट करणार आहेत. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सर्व प्रकारची काळजी घेऊनच काम केले जाणार आहे. संजय दत्त सध्या कुटूंबासह दुबईत आहे. तोही दिवाळीनंतर भारतात परत येईल. या महिन्यात अजय देवगणचा स्वतःचे शूटिंग पूर्ण करेल. त्यानंतर सोनाक्षी सिन्हा आणि नोरा फतेही यांच्यासह संपूर्ण कलाकारांना पॅचवर्कसाठी बोलवले जाईल. भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटाची स्टोरी काय? ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाची स्टोरी 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. ज्यामध्ये आईएएफ स्काड्रन लीडर विजय कार्णिक, जे त्यावेळी भुज विमानतळाचे प्रभारी होते. त्यांनी 300 स्थानिक महिलांसह एअरबेसची पुनर्बांधणी केली. हवाई दलाची शक्ती आणि पराक्रम यावर या आधारित चित्रपटाची कथा असणार आहे. हा चित्रपट देशावर आधारित आहे. यामुळे सगळेच प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची वाट पाहत आहे.

बॉलिवूडचा ‘संजू बाबा’ अर्थात संजय दत्त (Sanjay Dutt) यांने फुप्फुसाच्या कर्करोगावर नुकताच मात केली आहे.पीटीआयच्या रिपोर्टनुसार, संजय दत्त पूर्णपणे बरा झाला आहे. यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात संजय दत्तला कर्करोग झाल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर तो उपचारांसाठी अमेरिकेत गेला होता. कर्करोगावर मात केलेला संजय दत्त लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. चित्रीकरणाआधी संजय दत्त हेअरस्टाईलसाठी सेलिब्रिटी हेअरस्टाईलिस्ट आलीम हकीम याच्याकडे गेला होता. आलीम हकीमने संजय दत्तसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात संजूबाबाने सगळ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या : 

Baahubali | प्रभासच्या चाहत्यांसाठी पर्वणी, चित्रपटगृहात पुन्हा एकदा ‘बाहुबली’ अवतरणार!

Saif Ali Khan | सैफ अली खान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, करिनाकडून ‘भूत पोलीस’ चित्रपटाचे पोस्टर शेअर!

(Bhuj The Pride Of India movie will start Shooting)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.