मुंबई : भूमी पेडणेकर हिच्या आगामी ‘दुर्गामती‘ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची चर्चा सुरू होती. प्रत्येकजण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे. दरम्यान या चित्रपटाचे ‘हीर’ हे गाणे प्रसिद्ध झाले आहे. हे गाणे शेअर करताना भूमीने लिहले आहे की, “जैसे बिन रांझे के हीर अधूरी है… वैसे शक्ति के बिना चंचल.” (Bhumi Pednekar’s heer song from the movie Durgamati won the hearts of the fans)
हे गाणे चंचल आणि तिचा प्रियकर रोहन यांच्यामधील प्रेम कथेवर आधारित आहे. रोहनची भूमिका करण कपाडियाने करत आहे तर चंचलची भुमिका भूमी पेडणेकर करत आहे. या गाण्यामध्ये चंचल एका वाड्यामध्ये येऊन रोहनसोबत घालवलेले चांगले क्षण आठवत असते.
हे गाणे मालिनी अवस्थीने गायले आहे. त्याचबरोबर त्याचे संगीत नमन अधिकारी, अभिनव शर्मा आणि मालिनी अवस्थी यांनी दिले आहे. या गाण्याचे बोल दीप्ती मिश्रा यांनी लिहिले आहेत.
या अगोदर चित्रपटाचे पहिले गाणे ‘बरस बरस’प्रदर्शित झाले होते. हे गाणे प्रख्यात गायक बी पारक यांनी गायले आहे, हे एक थरारक गाणे आहे. भूमी पेडणेकर आणि करण कपाडियावर या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या गाण्यात भूमी आणि करणची रोमँटिक केमिस्ट्री बघायला मिळाली.
करणचा हा असा पहिला चित्रपट आहे जो कदाचित त्याला एक वेगळी ओळख देऊ शकेल. यापूर्वी करण ब्लाँक या चित्रपटात दिसला होता. दुर्गामतीमध्ये लोक भूमी आणि करणच्या केमिस्ट्रीचा वाट पहायत आहेत. हा चित्रपट 11 डिसेंबर रोजी Amazon प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
भूमी पेडणेकर ‘दुर्गामती’ या चित्रपटात दणदणीत भूमिकेत दिसत आहे. तिच्या या चित्रपटामध्ये माही गिलही एका विशेष भूमिकेत दिसत आहे. दुर्गामती चित्रपट अक्षय कुमार निर्मित आहे. पूर्वी या चित्रपटाचे नाव दुर्गावती असे होते परंतु ते बदलून दुर्गामती करण्यात आले. अक्षयला चित्रपट लक्ष्मी बॉम्बसारख्या कोणत्याही वादात पडायचे नसल्यामुळे अक्षयने अगोदरच चित्रपटाचे नाव बदलून घेतले आहे.
संबंधित बातम्या :
Anupam Kher | ‘शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने सुरू असल्याचे वाटते’,अनुपम खेर यांचे धक्कादायक विधान
(Bhumi Pednekar’s heer song from the movie Durgamati won the hearts of the fans)