Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhumika Chawla | ‘द कपिल शर्मा शो’मध्ये न बोलावल्याने भूमिका चावला नाराज; म्हणाली “मला खूप वाईट..”

'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 21 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. मात्र आतापर्यंत या चित्रपटाने कमाईचा 100 कोटींचा आकडा गाठला नाही. गेल्या सहा दिवसांत या चित्रपटाने 90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

Bhumika Chawla | 'द कपिल शर्मा शो'मध्ये न बोलावल्याने भूमिका चावला नाराज; म्हणाली मला खूप वाईट..
Kapil Sharma and Bhumika ChawlaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 1:54 PM

मुंबई : अभिनेत्री भूमिका चावलाने सलमान खानच्या ‘तेरे नाम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. मात्र त्यानंतर ती फारशा चित्रपटांमध्ये झळकली नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भूमिकाने तिला मिळालेल्या मोठमोठ्या चित्रपटांच्या ऑफर्सविषयी खुलासा केला होता. यात जब वी मेट, मुन्नाभाई एमबीबीएस, बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांचा समावेश होता. मात्र काही कारणास्तव भूमिकाला या चित्रपटांमध्ये रिप्लेस केलं गेलं. बऱ्याच वर्षांनंतर ती सलमान खानसोबत ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसली. या चित्रपटातील कलाकारांनी नुकतीच ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शोमध्ये हजेरी लावली होती. मात्र यावेळी भूमिका का गैरहजर होती, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर भूमिकाने कपिलकडून तिला आमंत्रण न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

“क्षणभरासाठी मला वाईट वाटलं पण..”

‘द कपिल शर्मा शो’मध्ये सलमान खान आणि पूजा हेगडे या मुख्य कलाकारांशिवाय इतर तीन जोड्या उपस्थित होत्या. शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम यांसारख्या कलाकारांचा त्यात समावेश होता. मात्र भूमिका त्यात कुठेच न दिसल्याने तिला याविषयी एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कपिलने तिला शोमध्ये बोलावलंच नव्हतं, असं भूमिकाने स्पष्ट केलं. “त्या एपिसोडची शूटिंग कधी झाली हे मला माहितच नाही. कदाचित त्यांची एखादी स्ट्रॅटेजी असेल. मला एका क्षणासाठी वाईट वाटलं. पण मग नंतर विचार केला की त्यात व्यंकटेश सर पण हजर नव्हते”, असं ती म्हणाली.

याविषयी भूमिकाने पुढे सांगितलं, “मी विचार केला की चित्रपटात आम्ही कपल होतो. तर व्यंकटेश सरांना न बोलावल्याने मी एकटी तिथे जाऊन काही उपयोग नव्हता. तिथे त्या तीन जोड्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं, ज्या तरुण आहेत. त्यामुळे चला ठीक आहे अशी मी माझीच समजूत घातली.”

हे सुद्धा वाचा

‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 21 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. मात्र आतापर्यंत या चित्रपटाने कमाईचा 100 कोटींचा आकडा गाठला नाही. गेल्या सहा दिवसांत या चित्रपटाने 90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सलमानच्या या चित्रपटात कलाकारांची मोठी फौजच पहायला मिळते.

हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.