बलात्कार प्रकरणी प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी कायद्याच्या कचाट्यात; हायकोर्टाचा दणका
झगमगच्या विश्वातून अशा घडलेल्या घटना ऐकायला मिळतात, ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसतो... बलात्कार प्रकरणी 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटीला हायकोर्टाचा दणका
मुंबई : झगमगच्या विश्वातून अशा घडलेल्या घटना ऐकायला मिळतात, ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसतो. टी-सीरीजचे मालक भूषण कुमार याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. भूषण कुमार पुन्हा एकादा बलात्कार प्रकरणी चर्चेत आले आहे. बलात्कार प्रकरणी भूषण कुमार याच्या अडचणीत देखील मोठी वाढ झाली आहे. बुधवारी भूषण कुमार याच्या विरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला. बलात्कार प्रकरणी भूषण कुमार याने कोर्टामध्ये एका याचिका दाखल केली होती. त्यानुसार टी-सीरीजच्या मालकावर बलात्काराचा खटला दाखल करणाऱ्या महिलेने आरोप मागे घेतले आहेत आणि महिला खटला रद्द करण्यासाठी देखील सहमत आहे…
महिला भूषण कुमार याच्यावर केलेले आरोप मागे घेण्यासाठी तयार आहे. पण मुंबई हाय कोर्टाने निर्णय सुनावताना भूषण कुमार याची याचिका फेटाळली आहे. शिवाय बलात्काराचे प्रकरण केवळ पीडितेने संमती दिल्याने रद्द करता येणार नाही… असं कोर्टाने निर्णय सुनावताना सांगितलं आहे. त्यामुळे भूषण कुमार याच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे.
संपूर्ण प्रकरणाविषयी सांगायचं झालं तर, महिलेने आरोप मागे घेतल्यानंतर आणि प्रकरण रद्द करण्यासाठी दर्शवलेल्या संमतीनंतर भूषण कुमार यांने एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती एएस गडकरी आणि पीडी नाईक यांच्या खंडपीठाने सांगितलं, केवळ तक्रारदाराने संमती दिल्याने, बलात्काराचा आरोप करणारी एफआरआर रद्द करण्यासाठी पुरेसे कारण नाही.
बलात्कार प्रकरणी न्यायालायाने म्हटलं की, समोरच्या पक्षाने संमती दिल्याने भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत एफआयआर रद्द करण्यात येईल, असा याचा अर्थ होत नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २ जुलै २०२३ रोजी होणार आहे.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
१६ जुलै २०२१ रोजी एका महिलेने भूषण कुमारवर ३ वेळा बलात्कार आणि धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला होता, त्यानंतर टी-सीरीज कंपनी पुढे आली आणि त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे सांगितले. आपल्या निवेदनात कंपनीने हे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हणत फेटाळून लावले होते. यापूर्वीही भूषण कुमारवर एका मॉडेलने लैंगिक छळाचा आरोप केला होता. यावर भूषण यांची पत्नी दिव्य खोसला कुमार यांनी आपल्या पतीला उघडपणे पाठिंबा दर्शवला आणि हे सर्व काम मिळवण्याचा आणि प्रसिद्धीच्या प्रकाशात येण्याचा प्रसिद्धी स्टंट होता, भूषण कुमार पूर्णपणे निर्दोष असल्याचे तिने म्हटले आहे.