Archana Gautam | अर्चना गौतम विरोधात मोठी कारवाई, काँग्रेस पक्षातून थेट इतक्या वर्षांसाठी हकालपट्टी
अर्चना गौतम हिला खरी ओळख ही बिग बाॅस 16 पासून मिळालीये. अर्चना गौतम ही कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. अर्चना गौतम ही बिग बाॅसच्या घरात नेहमीच वादात सापडताना दिसलीये. अर्चना गौतमची मोठी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
मुंबई : अर्चना गौतम आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळतंय. अर्चना गौतम (Archana Gautam) ही नेहमीच वादात असते. बिग बाॅस 16 मध्ये अर्चना गौतम ही सहभागी झाली. यावेळी कारण नसतानाही घरातील सदस्यांसोबत अनेकदा भांडताना देखील अर्चना गौतम ही दिसली. इतकेच नाही तर बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) मधील वादग्रस्त खेळाडू म्हणून अर्चना गौतम हिचे नाव चर्चेत आले. अर्चना गौतम ही बिग बाॅसनंतर थेट खतरो के खिलाडीमध्ये धमाका करताना दिसली.
अर्चना गौतम हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. अर्चना गौतम हिचा हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले. अर्चना गौतम हिचा व्हायरल होत असलेला तो व्हिडीओ दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेरील आहे. त्या व्हिडीओमध्ये अर्चना गौतम हिच्यासोबत तिचे वडील हे देखील दिसत आहेत.
अर्चना गौतम ही 29 सप्टेंबरला महिला आरक्षण विधेयकानंतर पार्टी अध्यक्ष खरगे आणि प्रियांका गांधी यांचे अभिनंदन करण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात पोहचली. मात्र, आतमध्ये अर्चना गौतम हिला प्रवेश देण्यात आला नाही. त्यानंतर काही महिला या अर्चना गौतम हिच्यासोबत धक्काबुक्की करताना दिसल्या. यावेळीचा व्हिडीओ व्हायरल झाला.
View this post on Instagram
यासर्व प्रकारानंतर अर्चना गौतम हिने काँग्रेसच्या काही नेत्यांवर गंभीर आरोप केले. आता यावर काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेत काही मोठे खुलासे करण्यात आले. काँग्रेस नेत्यांकडून हे स्पष्ट करण्यात आले की, अर्चना गौतम हिचे सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत. इतकेच नाही तर अर्चना गौतम हिच्यावर काँग्रेस नेत्यांनी नाराजी जाहीर केलीये.
काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, अर्चना गौतम ही कायमच खोटे आरोप करून अडकवण्याच्या धमक्या देते. यापूर्वीही अर्चना गौतम हिने तिरुपती मंदिरात मोठा गोंधळ घातलेला. इतकेच नाही तर यावेळी काँग्रेसकडून अर्चना गौतम हिची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आलीये. काँग्रेस समितीने 31 मे रोजी अभिनेत्रीला नोटीस पाठवली होती. 8 जूनला तिची पार्टीतून हकालपट्टी करण्यात आलीये.