Sunny Deol | ‘गदर 2’च्या यशानंतर ‘या’ कारणामुळे सनी देओल याने साईन केले नाहीत हे चित्रपट, मोठा खुलासा

सनी देओल याने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. सनी देओल याचा काही दिवसांपूर्वीच गदर 2 हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे सनी देओल याच्या या चित्रपटाने मोठा धमाका केला. हा चित्रपट हिट ठरला.

Sunny Deol | 'गदर 2'च्या यशानंतर 'या' कारणामुळे सनी देओल याने साईन केले नाहीत हे चित्रपट, मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 4:18 PM

मुंबई : गदर 2 या चित्रपटाने धमाका केला. सनी देओल याच्या गदर 2 (Gadar) चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले. इतकेच नाही तर गदर 2 हा चित्रपट (Movie) यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट ठरलाय. गदर 2 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ (Craze) बघायला मिळाली. गदर चित्रपट तब्बल 22 वर्षांनंतर चाहत्यांच्या भेटीला आला. परंतू तोच एक जलवा चित्रपट करताना नक्कीच दिसला.

गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल हा दिसला. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तो चित्रपटाचे प्रमोशन करत होता. काही दिवसांपूर्वीच नुकताच मुंबईमध्ये सनी देओल याच्याकडून गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीला बाॅलिवूडचे अनेक स्टार उपस्थित दिसले. विशेष म्हणजे जुना वाद विसरून शाहरूख खान हा देखील या पार्टीमध्ये पोहचला.

गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. एक अशी चर्चा तूफान रंगताना दिसतंय की, गदर 2 चित्रपटाच्या यशानंतर सनी देओल याने राजकुमार संतोषी यांचा एक चित्रपट साईन केलाय. मात्र, नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार हे सत्य नाहीये.

गदर 2 चित्रपटाच्या यशानंतर अजून एकही चित्रपट साईन सनी देओल याने केला नाहीये. त्याच्याकडे अनेक चित्रपटांच्या आॅफर आहेत. मात्र, अजून त्याने चित्रपट साईन केला नाहीये. सध्या सनी देओल हा अमेरिकेत आहे. काही दिवसांपासून सतत बिझी असल्याने सनी देओल हा कुटुंबियांना वेळ देऊ शकला नव्हता. वडील धर्मेंद्र यांच्या उपचारासाठी आता तो विदेशात गेलाय.

पुढील काही दिवस तो विदेशातच असेल. पूर्ण विचारू करूनच सनी देओल हा पुढचे चित्रपट साईन करणार असल्याचे देखील सांगितले जातंय. गदर 2 चित्रपटाच्या यशानंतर सनी देओल याच्याकडे चित्रपटांच्या मोठ्या आॅफर असल्याचे सांगितले जातंय. सनी देओल हा पुढील काही दिवसांमध्ये चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसू शकतो. सनी देओल याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची वाट पाहत आहेत.

सनी देओल याच्यासोबत गदर 2 चित्रपटामध्ये अमीषा पटेलही मुख्य भूमिकेत दिसली. सनी आणि अमीषा पटेल यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडल्याचे दिसले. गदर 2 चित्रपट रिलीज झाल्यानंतर सनी द्ओल याने सोशल मीडियावर  एक खास पोस्ट आपल्या चाहत्यांसाठी शेअर केली. या पोस्टमध्ये तो चाहत्यांना भांडू नका असे सांगताना दिसला.

भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.