बाॅलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन आणि रेखा यांची लव्ह स्टोरी अपूर्ण राहिली आहे. या दोघांच्या अफेअरची चर्चा अनेक वर्षे बाॅलिवूडमध्ये रंगताना दिसली. अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्यासोबत लग्न केले आणि आता यांना नातवंडे देखील झाली आहेत. आपल्या कुटुंबासोबत अमिताभ बच्चन हे एक सुखी जीवन जगतात. मात्र, दुसरीकडे रेखा या आजही एकटेपणाचे जीवन जगतात. रेखा यांनी लग्नच केले नाही. अनेक हिट चित्रपट रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी दिली आहेत.
तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, एकदा अमिताभ बच्चन यांनी सार्वजनिक ठिकाणी रेखा यांच्या कानाखाली मारली होती. दोन पेक्षाही अधिक वेळा अमिताभ बच्चन यांनी रेखा यांच्या कानाखाली मारल्या होत्या. लावारिस चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन यांनी रेखा यांना मारले होते. यानंतर अनेक चर्चा रंगताना दिसल्या. उपस्थित लोकही चांगलेच हैराण झाले.
त्याचे झाले असे की, चित्रपटाच्या सेटवर असलेल्या ईरानी डांन्सरच्या प्रेमात अमिताभ बच्चन हे पडल्याची चर्चा रंगली. ही चर्चा जेंव्हा रेखा यांच्यापर्यंत येऊन पोहचली, त्यावेळी त्यांनी थेट चित्रपटाचा सेट गाठला. त्यानंतर त्यांनी अनेक प्रश्न अमिताभ बच्चन यांना विचारले. यानंतर थेट अमिताभ बच्चन यांनी रेखा यांच्या कानाखाली जाळच काढला.
अमिताभ बच्चन यांचे हे रूप पाहून उपस्थित लोकही चांगलेच हैराण झाले. स्वत: रेखा यांना देखील धक्का बसला. यानंतर थेट त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत सिलसिला चित्रपटात काम करण्यासही नकार दिला. रेखा यांनी चित्रपटाला नकार दिल्याने दुसरीकडे यश चोप्रा यांचे टेन्शन वाढले. कारण या चित्रपटात अमिताभ आणि रेखा मुख्य भूमिकेत होते.
यानंतर यश चोप्रा यांनी अनेक प्रयत्न करून रेखा यांना या चित्रपटासाठी राजी केले. सिलसिला चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळाले नाही. अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी बाॅलिवूडमध्ये मोठा काळ गाजवला आहे. अनेकदा आजही एकमेकांसमोर आल्यावर एकमेकांना बोलणे टाळताना रेखा आणि अमिताभ बच्चन हे दिसतात.