‘एका महिन्यात मारून टाकणार…’, सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीकडून मोठा खुलासा

Salman Khan: गुंड लॉरेन्स बिष्णोईचं कौतुक करत आरोपीने केला मोठा खुलासा, 5 कोटी रुपये का मागितले? याचं मोठं कारण देखील समोर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याला मिळणाऱ्या धमक्यांची चर्चा...

'एका महिन्यात मारून टाकणार...', सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीकडून मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 12:58 PM

Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला जीवेमारण्याची धमकी देणाऱ्या आणि 5 कोटी रुपये खंडनी मागणारा आरोपी बीखाराम बिष्णोई याला कर्नाटक येथूल अटक केली आहे. बीखाराम बिष्णोई याने पोलीस चौकशीत धक्कादायक खुलासा केला आहे. पोलीस चौकशीमध्ये बीखाराम बिष्णोई याने लॉरेन्स बिष्णोई माझ्या प्रेरणा स्थानी आहे… असं म्हणत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. शिवाय 5 कोटी रुपये का मागितले याचं कारण देखील सांगितलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस चौकशी दरम्यान आरोपीने दावा केला आहे की, सलमान खानकडून मागण्यात आलेल्या 5 कोटी रुपयांमधून बिष्णोई समाजाचं मंदीर बांधणार होतो. वरळी पोलिसांच्या तपासात असंही समोर आलं आहे की, आरोपी लॉरेन्स बिष्णोईचे व्हिडिओ सतत पाहत असतो आणि लॉरेन्स तुरुंगात राहून बिष्णोई समाजासाठी जे काही करत आहेत त्याचा त्याला अभिमान आहे.

हे सुद्धा वाचा

चौकशी दरम्यान आरोपी म्हणाला, सलमान खानने जे काही केलं आहे, त्यासाठी त्याने माफी मागायला हवी. फूटपाथवर झोपलेल्या लोकांना वाहनांनी चिरडले किंवा काळवीटाच्या शिकारीचे प्रकरण असो. लॉरेन्स बिश्नोई जे काही करत आहे ते योग्यच आहे, तुरुंगात गेल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही, मी बिष्णोई समाजासाठी तुरुंगात जात आहे.’ असं देखील आरोपी म्हणाला.

सलमान खान याला पुन्हा मिळाली जीवेमारण्याची धमकी…

मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेला धमकीचा मेसेज आल्याची माहिती सध्या समोर येत आहे. गुरुवारी रात्री अभिनेत्याला जीवेमारण्याची धमकी मिळाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सलमान खान याला बिष्णोई गँगकडून जीवेमारण्याची धमकी मिळाली आहे. सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई यांच्यावर गाणं लिहिणाऱ्याला सोडणार नाही… असा मेसेज लिहिण्यात आला आहे.

सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई यांच्यावर गाणं लिहिणाऱ्याला एका महिन्याच्या आत मारलं जाईल… असं मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे. सलमान खानमध्ये हिंमत असेल तर त्याने गाणं लिहिणाऱ्याचे प्राण वाचवावे… असं देखील आरोपी म्हणाला आहे. याप्रकरणी पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.