Singham 3 | अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली, ‘सिंघम 3’ चित्रपटाबद्दल मोठे अपडेट, स्क्रीप्टही

रोहित शेट्टी याचा काही दिवसांपूर्वीच सर्कस हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रोहित शेट्टी हा दिसला होता. मात्र, असे असतानाही चित्रपट फ्लाॅप गेला.

Singham 3 | अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली, 'सिंघम 3' चित्रपटाबद्दल मोठे अपडेट, स्क्रीप्टही
Follow us
| Updated on: Jul 17, 2023 | 4:29 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रोहित शेट्टी (Rohit Shetty) हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच रोहित शेट्टी याचा सर्कस हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि हा चित्रपट (Movie) फ्लाॅप गेला. विशेष म्हणजे सर्कस या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रोहित शेट्टी हा दिसला. सर्कस या चित्रपटामध्ये रणवीर सिंह (Ranveer Singh) हा मुख्य भूमिकेत होता. गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंह याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास धमाल करू शकत नाहीयेत. एका मागून एक असे रणवीर सिंह याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. सर्कस हा बिग बजेटचा चित्रपट होता. मात्र, त्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.

आता रोहित शेट्टी हा त्याच्या आगामी सिंघम 3 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच रोहित शेट्टी याने सिंघम 3 चित्रपटाबद्दल अत्यंत मोठे अपडेट दिले आहे. यामुळे चाहत्यांमध्ये मोठा उत्साह हा बघायला मिळतोय. विशेष म्हणजे सिंघम 3 चित्रपटाची स्क्रीप्ट तयार असल्याचे देखील रोहित शेट्टी हा सांगताना दिसला आहे.

सिंघम अगेन चित्रपटाचे काम दोन ते तीन महिन्यांमध्ये सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे परत एकदा रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांची जोडी धमाका करताना दिसणार आहे. अजय देवगण याच्यासोबतच करीना कपूर ही देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिंघम चित्रपटावर चाहते मोठ्या प्रमाणात प्रेम करतात.

सिंघम चित्रपटाच्या शूटिंगला थोडा वेळ आहे. इंडियन पुलिस फोर्सचे सध्या काम सुरू असल्याचे देखील सांगितले जात आहे. रोहित शेट्टी हा देखील काही दिवसांपासून खतरो के खिलाडीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, दुसरीकडे चाहते सिंघम 3 चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

रोहित शेट्टी याचे चित्रपट कायमच बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसतात. मात्र, या फक्त सर्कस हा चित्रपट अपवाद ठरला. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रोहित शेट्टी हा म्हणाला की, सर्कस चित्रपटामध्ये नक्कीच काही आमच्या चुका झाल्या. मात्र, चित्रपटाचे यश आणि अपयश हे मीच एकटा नेहमीच घेतो. कोणालाही दोष देण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.