इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी यांच्या नात्याला पालकांकडून मिळालीये मंजुरी? अभिनेत्रीचा मोठा खुलासा
श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पलक तिवारी हिचा काही दिवसांपूर्वीच किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. विशेष म्हणजे थेट पहिल्याच चित्रपटामध्ये सलमान खान याच्यासोबत काम करण्याची संधी तिला मिळाली.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी (Palak Tiwari) ही जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे पलक तिवारी हिने नुकताच बाॅलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. पहिल्याच चित्रपटामध्ये थेट सलमान खान याच्यासोबत काम करण्याची सुवर्णसंधी ही पलक तिवारी हिला मिळालीये. आपल्या मुलीच्या बाॅलिवूड पर्दापणासाठी श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिने खूप जास्त मेहनत घेतल्याचे सांगितले जाते. इतकेच नाही तर पलक तिवारी हिला घेऊन अनेक चित्रपट निर्मात्यांकडे श्वेता तिवारी ही गेली होती. शेवटी आपल्या चित्रपटामध्ये (Movie) काम करण्याची सुवर्णसंधी ही सलमान खान यानेच पलक तिवारी हिला दिली. श्वेता तिवारी आणि सलमान खान हे खूप चांगले मित्र आहेत.
किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत पलक तिवारी होती. मात्र, पलकच्या अभिनयाची जादू फार काही बघायला मिळाली नाही. एका मुलाखतीमध्ये पलक तिवारी हिनेच स्पष्ट केले होते की, लोक माझा नाही तर सलमान खान याचा अभिनय बघण्यासाठी येत आहेत. मुळात मला बघण्यासाठी कोणीच येत नाहीये.
गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, पलक तिवारी ही सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान याला डेट करत आहे. विशेष म्हणजे या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकताच पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान हे थिएटरमध्ये चित्रपट बघण्यासाठी एकसोबत गेले होते.
नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये पलक तिवारी हिने मोठा खुलासा करत म्हटले की, माझी आई खूप जास्त याबाबतीत कडक आहे. तिला बऱ्याच वेळा वाटते की, तिने मला जास्तच मोकळीक दिलीये. ज्यावेळी माझ्या अफेअरच्या चर्चा सुरू असतात त्यावेळी तिला कायमच टेन्शन येते. मला ती नेहमीच बातम्यांच्या लिंक देखील पाठवते.
ज्यावेळी माझ्या अफेअरच्या चर्चा या सुरू होतात, त्यावेळी ती मला म्हणते की, हा कोण आहे, कुठून आलाय? मग मला तिला काही गोष्टी या समजून सांगाव्या लागतात. पलक तिवारी आणि इब्राहिम अली खास हे एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, या दोघांनीही आपल्या नात्यावर काहीच भाष्य केले नाहीये. आता हे यांच्या नात्याबद्दल काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत. इब्राहिम अली खान याला त्याच्या आयुष्यातील निर्णय घेण्यासाठी मोकळीक दिली आहे.