सैफ अली खान हल्लाप्रकरणी मोठी अपडेट, हल्ला करणारा आणि अटकेतील आरोपीचं सत्य अखेर समोर
Saif Ali Khan: सैफ अली खानवर हल्ला करणारा आणि अटकेतील आरोप आहे वेगळा? आरोपीचं सत्य अखेर समोर, सैफ अली खान हल्लाप्रकरणी मोठी अपडेट... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ अली खान हल्ला प्रकरणाची चर्चा...

अभिनेता सैफ अली खान हल्लाप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहे. पोलिसांना एफएसएल रिपोर्ट मिळाला आहे. रिपोर्टमध्ये हल्ला करणारा आणि अटकेतील आरोपी एकच असल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला अटकेतील आरोपी आणि हल्लेखोर वेगळा असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता सीसीटीव्हीत दिसलेला आरोपी आणि अटकेतील आरोपी एकच असल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेत्यावर हल्ला केल्यानंतर 19 जानेवारी रोजी पोलिसांनी ठाणे येथून शरीफुल याला अटक केली होती.
शरीफुल याला अटक केल्यानंतर अटकेतील आरोपी आणि हल्लेखोर वेगळा असल्याचा युक्तीवात वकिलांनी कोर्टात केला होता. पण आका एफएसएल रिपोर्ट समोर आल्यानंतर अटकेतील आरोपी आणि हल्लेखोर एकच असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या ओळखीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आरोपीचे फिंगर प्रिंट्स देखील वेगळे होते. त्याच्या चेहऱ्यामध्ये देखील फार फरक दिसून येत होता. अशात आरोपीचं रिकॉग्निशन टेस्ट करण्यात आली. यामध्ये आरीपीचे फिंगर प्रिंट्स आणि फुट प्रिंट्स मॅच झाले आहेत. मुंबई पोलिसांनी आरोपीची फेशियल रिकग्नेशन टेस्ट केली ज्यात आरोपी तोच असल्याचं स्पष्ट झालं आहे.
शरीफुलचे वकिलाने न्यायालयात उपस्थित केले प्रश्न?
शरीफुलचे वकील दिनेश प्रजापती यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि अटक करण्यात आलेल्या आरोपीबद्दल प्रश्न निर्माण केले होते. सैफच्या घरातून सापडलेले सीसीटीव्ही फुटेज आणि अटक आरोपीचे फोटो न्यायालयात दाखवून वकिलाने सांगितले की, पोलिसांनी पकडलेली व्यक्ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळी आहे.
दोघांचे चेहरे देखील सारखे नाहीत. पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला अटक केली आहे.. असं देखील शरीफुल याच्या वकिलांचं म्हणणं होतं. शिवाय अटक करताना पोलिसांनी कायदेशीर नियमांचे पालन केलं नाही… असं देखील वकील म्हणाले होते. अखेर आता हल्ला करणारा आणि अटकेतील आरोपी एकच असल्यानंतर याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.