ऐश्वर्या – अभिषेकच्या घटस्फोटाबाबत मोठी अपडेट?, आता …
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या सेपरेशनबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे चाहते चिंतेत आहेत. मात्र या सगळ्या दरम्यान चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चनने नुकतेच पत्नी ऐश्वर्या रायला मनवण्यासाठी एक सरप्राईज दिले . अभिषेकने ऐश्वर्या रायची समजूत घालत तिला मनवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हे जोडपं सध्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. बच्चन कुटुंबाबद्दल रोज काही ना काही नवी बातमी समोर येत असते. त्यामुळे चाहत्यांची चिंताही वाढली आहे. मात्र याच सर्व परिस्थिती दरम्यान चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चनने नुकतेच पत्नी ऐश्वर्या रायला मनवण्यासाठी एक सरप्राईज दिले होते. अभिषेकने नुकतीच नवीन कार खरेदी केली आहे. विशेष म्हणजे या कारचा 5050 हा क्रमांक ऐश्वर्याचा आवडता क्रमांक आहे. त्यामुळे अभिषेकने ऐश्वर्या रायची समजूत घातली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे दोघे विभक्त झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसंपासून सोशल मीडियावर सुरू आहे. अंबानींच्या पार्टीला संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र आलं पण त्यावेळी ऐश्वर्या सोबत नव्हती. उलट ती आराध्यासोबत वेगळी आल्यानंतर त्यांच्यात काहीच आलबेल नाही का, विभक्त होणार का अशा चर्चांनी जोर धरला. तेव्हापासून हे जोडपे वेगळे होत असल्याची चर्चा आहे. इतकेच नाही तर अभिषेक बच्चनने नुकतीच घटस्फोटासंदर्भातील एका आर्टिकलची पोस्टही लाईक केली होती. त्यानंतर घटस्फोटाच्या बातम्यांना अधिकच वेग आला.
१७ वर्षांपूर्वी झालं होतं लग्न
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या दोघांच्या चाहत्यांची संख्या कमी नाही आणि त्यांच्या वेगळं होण्याच्या बातमीने सगळेच चिंतेत पडले आहेत. अनेक वर्षांपूर्वी गुरू चित्रपटाच्या प्रीमियरवेळी न्यूयॉर्कमध्ये अभिषेकने ऐश्वर्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर 20 एप्रिल 2007 रोजी दोघे विवाहबद्ध झाले, तेव्हा त्यांचे कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. 2011 मध्ये त्यांची मुलगी आराध्या बच्चनचा जन्म झाला आणि आता ती 14 वर्षांची आहे.
अभिषेक बच्चनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो किंग या चित्रपटात दिसणार आहे. किंग या चित्रपटात शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना झळकणार असून अभिषेक बच्चन नकारात्मक भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजय घोष करत आहेत तर सिद्धार्थ आनंद आणि गौरी खान या चित्रपटाचे निर्माते आहेत. आता या चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाची भूमिका कशी साकारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.