राखी सावंतच खरी एंटरटेनर, बीग बॉसकडून कौतुक; प्रवास पाहून कुटुंबीय भावूक!
बिग बॉसच्या घरात रुबीना, अली, राहुल, निक्की आणि राखी हे सदस्य आहेत.
मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14)चा फिनाले वीक संपत आला आहे. आता दोन दिवसांमध्ये समजेल की, बिग बॉस 14 चा विजेता कोण असणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात रुबीना, अली, राहुल, निक्की आणि राखी हे सदस्य आहेत आणि यापैकीच एक बिग बॉस 14 चा विजेता असणार आहे. बिग बॉस संपण्यापूर्वी घरातील सर्व सदस्यांच्या बिग बॉसमधील सुरूवातीपासूनचा प्रवास घरातील सदस्यांना दाखवण्यात आला आहे. (Bigg Bigg 14 Finale Week, the entire journey shown by members of the household)
Maha-entertainment se kiya #RakhiSawant ne #BiggBoss aur poore desh ko impress, aur jeet liya sabka dil!
Aaj raat khadi hongi woh #BB14 ke stage par, dekhne apne safar ki jhalak. Dekhiye #BB14FinaleWeek mein, raat 9 baje.
Catch it before tv on @VootSelect.@BeingSalmanKhan pic.twitter.com/u2z1bQ2oF5
— ColorsTV (@ColorsTV) February 20, 2021
यावेळी घरातील सर्वजण भावूक झाले होते. यादरम्यान बिग बॉसने राखी सावंतला शोचे खरे एंटरटेमेंट म्हटले आहे. राखीला बिग बॉस म्हणतात की, बिग बॉसची ओळख निर्माण करणारी व्यक्ती म्हणजे राखी सावंत आहे. राखी सावंतने खूप एंटरटेमेंट केलं आहे आणि इतर फक्त तिची कॉपी करतात. बिग बॉसचे हे बोलणे ऐकल्यानंतर राखी पुन्हा रडत म्हणते की, कोटि-कोटि प्रणाम बिग बॉस यानंतर रुबीनाचा प्रवास दाखविला जातो.
Apne rishte aur #BiggBoss14 ka safar yaad kar emotional ho gayi @RubiDilaik. Dekhiye inke iss safar ki jhalak aaj raat 9 baje, #BB14FinaleWeek mein, #Colors par.
Catch it before tv on @VootSelect.#BB14 @BeingSalmanKhan@AmlaDaburIndia @LotusHerbals pic.twitter.com/WbGMhguWjc
— Bigg Boss (@BiggBoss) February 20, 2021
बिग बॉस म्हणतात की, आपले विवाह संबंध टिकवण्याच्या उद्देशाने आपण या घरात आला होता. आपला प्रवास स्वत: ला जाणून घेणे आणि समजणे असा आहे. हा सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय प्रवास आहे, यावेळी रूबीना बिग बॉस धन्यवाद म्हणते.
Chattaan jaise mazboot iraade liye @rahulvaidya23 badh rahe hain Finale ki ore. Dekhiye inka safar aaj raat #BB14FinaleWeek mein 9 baje, #Colors par.
Catch it before tv on @VootSelect.#BB14 @BeingSalmanKhan@AmlaDaburIndia @LotusHerbals pic.twitter.com/SCUJD5aNn7
— ColorsTV (@ColorsTV) February 20, 2021
राहुलचा प्रवास दाखवला जातो त्यावेळी राहूल म्हणतो की, मी चूकी केली आहे या अगोदर मी या शोमध्ये का आलो नाही. यानंतर बिग बॉस अली गोनीचा प्रवास दाखवण्यास सुरूवात करतात त्यावेळी बिग बॉस म्हणतात की, बिग बॉस 14 जिंकण्यासाठी प्रत्येकजण घरात आला आहे मात्र, याला अपवाद फक्त अली गोनी आहे कारण तो शोमध्ये त्याच्या मित्रांना जिंकवण्यासाठी आला होता.
Apne doston ke liye khel kar @AlyGoni ne jeet liya #BiggBoss aur desh ka dil. Dekhiye inke khushi ke pal aaj raat 9 baje, #Colors par.
Catch it before tv on @VootSelect.#BB14 #BB14FinaleWeek #BiggBoss14 @BeingSalmanKhan@AmlaDaburIndia @LotusHerbals pic.twitter.com/3fA1nn1rKD
— Bigg Boss (@BiggBoss) February 20, 2021
यानंतर शेवटी बिग बॉस निक्की तांबोळीचा प्रवास दाखवतात त्यावेळी बिग बॉस म्हणतात की, निक्की सुरूवातीपासूनच बिग बॉस 14 च्या विजेत्या सारखे वागत होती. त्यावेळी निक्की म्हणते की, बिग बॉसमध्ये येण्याचे माझे स्वप्न होते.
संबंधित बातम्या :
Bigg Boss 14 | राहुल वैद्यवर निक्की तांबोळी नाराज, वाचा काय घडलं
बिग बॉस-15ची घोषणा; होस्ट म्हणून सलमान खान घेणार इतकी मोठी रक्कम!
Bigg Boss 14 | सलमान खानने राहुल वैद्य आणि अली गोनीला झापलं!
(Bigg Bigg 14 Finale Week, the entire journey shown by members of the household)