VIDEO: ‘अंगुरी भाभी’ शिल्पा शिंदे अभिनय सोडून कन्स्ट्रक्शन क्षेत्रात?; व्हिडीओ शेअर करून दिला ‘हा’ सल्ला
'अंगुरी भाभी' फेम आणि 'बिग बॉस-11व्या' पर्वाची विजेती, अभिनेत्री शिल्पा शिंदेने कोरोना काळात अॅक्टिंगला रामराम केला की काय अशी चर्चा आहे. (Bigg Boss 11 Winner Shilpa Shinde Shares Video With A Drill Machine)
मुंबई: ‘अंगुरी भाभी’ फेम आणि ‘बिग बॉस-11व्या’ पर्वाची विजेती, अभिनेत्री शिल्पा शिंदेने कोरोना काळात अॅक्टिंगला रामराम केला की काय अशी चर्चा आहे. बरं हे आम्ही सांगत नाही. तर शिल्पाने एक व्हिडीओ शेअर केल्याने या चर्चेने जोर धरला आहे. या व्हिडीओत शिल्पा एका कन्स्ट्रक्शन साईटवर ड्रिलिंग मशीन हातात घेऊन ड्रिलिंग करताना दिसत आहे. त्यामुळे शिल्पाने खरोखरच अभिनय सोडून कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात उडी घेतलीय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Bigg Boss 11 Winner Shilpa Shinde Shares Video With A Drill Machine)
शिल्पा शिंदेने शेअर केलेला व्हिडीओ अत्यंत छोटा आहे. या व्हिडीओत शिल्पाने जीन्स, कुर्ता आणि कॅप परिधान केले आहे. त्यानंतर हातात ड्रिल मशीन घेऊन ती ड्रिल करताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओसोबत तिने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने आपण कन्स्ट्रक्शन फिल्डमध्ये आल्याचं म्हटलं आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे शुटिंग बंद असल्याने ती एका कन्स्ट्रक्शन साईटवर आली असता तिने हा व्हिडीओ काढल्याचं सूत्रांनी सांगितलं.
शिल्पा काय म्हणते?
लॉकडाऊन सुरू झाल्यावर मी कन्स्ट्रक्शन फिल्डमध्ये आले आहे. ज्यांच्याकडे आता काही काम नाही ते लोक आपली फिल्ड चेंज करू शकतात. काळ सर्व काही व्यवस्थित करेल. सकारात्मक राहा, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
चाहत्यांकडून कौतुक
शिल्पाच्या या व्हिडीओला तिच्या चाहत्यांनी प्रचंड लाईक्स दिल्या आहेत. अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. तुम्ही ऑल राऊंडर गर्ल आहात. तुमच्यावर ईश्वराचा आशीर्वाद राहो, तुम्ही सुरक्षित राहा, असं एका यूजर्सने म्हटलं आहे. तर दुसऱ्या यूजर्सने, ही असली शिल्पा शिंदे आहे. बिग बॉसमध्ये होती अगदी तशीच. तुम्ही नेहमीच वास्तववादी राहिल्या आहात. हॉलिडे फोटो शेअर करणाऱ्या इतर सेलिब्रिटीज सारख्या तुम्ही नाहीत, असं म्हटलं आहे. कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं, अशी प्रतिक्रियाही एका यूजर्सने दिली आहे. (Bigg Boss 11 Winner Shilpa Shinde Shares Video With A Drill Machine)
View this post on Instagram
संबंधित बातम्या:
कंगना रनौतच्या वैयक्तिक अंगरक्षकाला बेड्या, लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण आणि फसवणूक केल्याचा आरोप
VIDEO : नीज माझ्या नंदलाला, गायक मंगेश बोरगावकरच्या मुलीची धाकट्या बहिणीसाठी गोड अंगाई
Radhe | अरारारारा… खतरनाक! प्रवीण तरडे म्हणतो, सलमानसाठी ‘राधे’ केला, पण…
(Bigg Boss 11 Winner Shilpa Shinde Shares Video With A Drill Machine)