Salman Khan | ‘तो कायम मला गप्प करायचा, कारण…’, प्रसिद्ध अभिनेत्रीकडून सलमान खान याच्यावर गंभीर आरोप

Salman Khan | 'मी त्याचा आदर करायची पण त्याने तर...', सलमान खान यांच्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीकडून गंभीर आरोप, भाईजानच्या अडचणीत वाढ? सध्या सर्वत्र सलमान खान याची चर्चा... अभिनेत्रीने का केलेत भाईजानवर असे आरोप?

Salman Khan | 'तो कायम मला गप्प करायचा, कारण...', प्रसिद्ध अभिनेत्रीकडून सलमान खान याच्यावर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 12:09 PM

मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : अभिनेता सलमान खान आणि वादग्रस्त प्रकरणांचं फार जवळचं नातं आहे. आजपर्यंत फक्त अभिनेत्री नाही तर, अनेक अभिनेत्यांनी देखील सलमान खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एवढंच नाही तर, अनेक प्रकणांमुळे भाईजान याला कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमान खान याच्यावर आरोप केले आहेत. म्हणून सलमान खान पुन्हा चर्चेत आला आहे. सलमान खान याच्यावर आरोप करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘बिग बॉस १३’ फेम अभिनेत्री हिमांशी खुराना आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत हिमांशी खुराना हिने सलमान खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

बिग बॉसच्या १३व्या सीझनमध्ये दिसलेली हिमांशी खुरानी हिने ‘बिग बॉस’चा होस्ट आणि सलमान खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्री म्हणाली, ‘बिग बॉसनंतर मी अनेक वाईट गोष्टींचा सामना केला आहे.’ हिमांशीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पॉडकास्ट दरम्यान स्वतःच्या मानसिक आरोग्याबद्दल बोलताना दिसतो.

अभिनेत्री म्हणाली., ‘बिग बॉस 13 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर मी त्रासली होती. माझं मानसिक आरोग्य ठिक नव्हतं. माझ्या आयुष्यात सर्वकाही सुरळीत सुरु होतं. तरी देखील मी आनंदी नव्हतं. काही तरी सुटत आहे असं कायम मला वाटत होतं. त्यानंतर मी माझ्या टीमसोबत चर्चा केली. सायकोलॉजिस्टची मदत घेतलीय पण काहीच मनासारखं होत नव्हतं.’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘यानंतर मी अध्यात्माकडे वळले. अध्यात्माकडे वळल्यानंतर मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आता मला पू्र्वीपेक्षा बरं वाटत आहे..’ स्वतःच्या आरोग्याबद्दल सांगत असताना अभिनेत्रीने सलमान खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हिमांशी हिची चर्चा रंगत आहे.

‘बिग बॉस १३’ बद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘शोमध्ये माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले. माझ्या प्रत्येक गोष्टीला चढवून टीव्हीवर दाखवण्यात आलं. मी अन्य स्पर्धकांमध्ये वाद लावून देते.. हे शोमध्ये दाखवलं जायचं. जेव्हा मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न करायची मला गप्प केलं जायचं. मी तेव्हा शांत व्हायची कारण मी होस्टचा आदर करायची..’

‘माझ्या पालकांनी मला नेहमी शिकवलं आपल्यापेक्षा मोठे बोलत असतील तेव्हा आपण शांत बसायचं. मी त्याचा आदर करत होती पण त्याने मला नेहमीच चुकीचं दाखवलं.’ असं हिमांशी खुराना म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त हिमांशी खुराना हिने सलमान खान याच्यावर केलेल्या आरोपांची चर्चा रंगली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.