Bigg Boss 14 | बिग बॉसच्या घरातील सहा सदस्य नॉमिनेशन प्रक्रियेत

बिग बॉस 14 (Bigg Boss 14) कालच्या एपिसोडची सुरूवात नॉमिनेशन प्रक्रियेने झाली. बिग बॉसने घरातील सदस्यांना यावेळी काहीसा वेगळ्या प्रकारचा टास्क देण्यात आला होता.

Bigg Boss 14 | बिग बॉसच्या घरातील सहा सदस्य नॉमिनेशन प्रक्रियेत
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 5:21 PM

मुंबई : बिग बॉस 14 (Bigg Boss 14) कालच्या एपिसोडची सुरूवात नॉमिनेशन प्रक्रियेने झाली. बिग बॉसने घरातील सदस्यांना यावेळी काहीसा वेगळ्या प्रकारचा टास्क देण्यात आला होता. घरातील सदस्यांना दुसर्‍या सदस्याच्या नावाचा पोपट देण्यात आला. आणि एक पिंजरा देखील देण्यात आला होता. यामध्ये सदस्य आपल्याकडे असलेला पोपट पिंजऱ्यामध्ये ठेवून त्या सदस्याला या आठवङ्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेत टाकायचे होते. निक्कीकडे अलीचा पोपट होता, तर जास्मीनकडे निक्कीचा पोपट होता. पवित्राजवळ जास्मीनचा, अलीकडे रुबीनाचा नावाचा, अभिनवकडे राहुलचा, एजाजकडे अभिनवचा, राहुलकडे एजाजचा पोपट होता.(Bigg Boss 14 | 6 members of Bigg Boss House are in the nomination process)

टास्कच्या सुरूवातीलाच बिग बॉस रुबीना दिलैकला विचारतात की, तुझाकडे असलेला इम्युनिटी स्टोनमुळे तु बिग बॉस 14 मध्ये एकदा सुरक्षित राहू शकते, तर तुला यावेळी नॉमिनेशन प्रक्रियेतून वाचायचे आहे का? यावर रुबीना दिलैक नकार दिला. नॉमिनेशन टास्कमध्ये सुरक्षित राहण्यासाठी घरातील सदस्य एकमेकांना बोलताना दिसतात. एजाज अभिनवला म्हणतो, तु राहुलला नॉमिनेशनम प्रक्रियेत सुरक्षित ठेव. मात्र, अभिनव एजाजचे काही ऐकत नाही. आणि राहुलला नॉमिनेट करतो.

या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेतून घरातील फक्त दोनच सदस्य सुरक्षित आहे. त्यामध्ये कविता आणि एजाज कविता कॅप्तान असल्यामुळे ती अगोदरच सुरक्षित होती. तर, कविताला बिग बॉसने एक विशेष अधिकार देत घरातील नॉमिनेशट सदस्यांपैकी एका सदस्याला सुरक्षित करण्याचा अधिकार दिला होता. त्यामध्ये कविता एजाजला वाचवते.

अनेक वादग्रस्त प्रकरणांनंतर गायक जान कुमार सानू अखेर ‘बिग बॉस 14’च्या (Bigg Boss 14) घरातून बेघर झाला आहे. ‘वीकेंड का वार’च्या एलिमिनेशन प्रक्रियेत जान कुमार सानूचे नाव आल्याने त्याला घरातून गाशा गुंडाळावा लागला. यावेळी घरात निर्माती एकता कपूर मोठे धमाके घेऊन आली होती. टीव्ही क्वीन एकता कपूरने ‘बिग बॉस 14’च्या घरात स्पर्धकांची परीक्षा घेतली. एकता कपूरच्या या परीक्षेत केवळ निक्की तंबोली आणि रुबीना दिलैक या दोघीच उत्तीर्ण झाल्या आहेत. एकता कपूरने घरातील स्पर्धकांना एकमेकांच्या ‘एक्झिट’ तारखा ठरवण्यास सांगितल्या होत्या. यावेळी जान कुमार सानू आणि कविता कौशिक खेळाच्या 7व्या आठवड्यात घराबाहेर पडतील, असा अंदाज बहुमताने बांधण्यात आला होता.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस 14’च्या घरात राहुल वैद्य-जान सानू दरम्यान घमासान सुरूच!

Bigg Boss 14 | प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘बिग बॉस 14’च्या घरात ‘भूतं’ अवतरणार!

(Bigg Boss 14 | 6 members of Bigg Boss House are in the nomination process)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.