Special Story | ‘बिग बॉस’च्या आलिशान घरात राहण्यासाठी तुमचे लाडके कलाकार घेतात ‘इतके’ मानधन!

'बिग बॉस'च्या आलिशान घरात राहण्यासाठी हे स्पर्धक अर्थात प्रेक्षकांचे लाडके कलाकार तब्बल लाखांमध्ये मानधन घेतात. वाचून आश्चर्य वाटेल, परंतु दर आठवड्याला त्यांना हे लाखो रुपये दिले जातात.

Special Story | ‘बिग बॉस’च्या आलिशान घरात राहण्यासाठी तुमचे लाडके कलाकार घेतात 'इतके' मानधन!
'बिग बॉस 14' स्पर्धकाच्या उद्धटपणामुळे सलमानला राग अनावर
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 1:07 AM

मुंबई : सध्या मालिकांच्या विश्वात ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम सध्या प्रचंड गाजतो आहे. या कार्यक्रमाचे यंदा 14वे पर्व सुरु आहे. हे पर्व विशेष गाजले ते यातील स्पर्धकांमुळे… नव्या स्पर्धकांबरोबरच या पर्वात काही जुने स्पर्धक देखील झळकले. वाढ-विवाद, हाणामारी आणि बाचाबाची हे प्रकार दरवर्षीप्रमाणेच या वर्षी देखील बघायला मिळाले. यावेळेस बॉलिवूड आणि मनोरंजन विश्वाचे अनेक बडे चेहरे या स्पर्धेत बघायला मिळाले. जास्मीन भसीन, एजाज खान, पवित्रा पुनिया, रुबीना दिलैक, अभिनव शुक्ला, निशांतसिंग मलकानी आणि राहुल वैद्य अशी काही स्पर्धकांची नावं आहेत (Bigg Boss 14 Contestants fees for per week episode).

सुरुवातीला नव्या स्पर्धकांवर सत्ता गाजवण्यासाठी मागील पर्वातील काही स्पर्धक ‘तूफानी सिनिअर्स’ बनून घरात आले होते. मागील पर्वाचा विजेता सिद्धार्थ शुक्ला, हीना खान आणि गौहर खान यांनी या घरात एंट्री घेतली होती. कालांतराने एक एक करत बरेच स्पर्धक घराबाहेर झाले होते. मात्र, आता या स्पर्धेत ‘मसाला’ आणण्यासाठी पुन्हा एकदा राखी सावंत, विकास गुप्ता, अर्शी खान, राहुल महाजन, मनु पंजाबी यांना देखील सामील करण्यात आले आहे. या आलिशान घरात राहण्यासाठी हे स्पर्धक अर्थात प्रेक्षकांचे लाडके कलाकार तब्बल लाखांमध्ये मानधन घेतात. वाचून आश्चर्य वाटेल, परंतु दर आठवड्याला त्यांना हे लाखो रुपये दिले जातात.

बिग बॉसमध्ये सहभागी स्पर्धकांना मिळते इतके मानधन!

– ‘बिग बॉस’पवित्रा पुनिया आठवड्याला तब्बल 1.5 लाख रुपयांचं मानधन घेते.

– प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू याला दर आठवड्याला 80 हजार रुपये दिले जात होते.

– ‘इंडियन आयडॉल’मधून नावारुपास आलेल्या मराठमोळ्या राहुल वैद्यला दर आठवड्याला एक लाख रुपये मिळतात.

– ‘बिग बॉस’च्या घरात सर्वाधिक चर्चेत असलेल्या निक्की तंबोलीला 1.2 लाख रुपये मिळतात.

– अभिनेता अभिनव शुक्लाला दर आठवड्याला 1.5 लाख रुपये मानधन मिळतं.

– मालिका विश्वातला प्रसिद्ध अभिनेता एजाज खान याला 1.8 लाख रुपये मिळतात.

– नवोदित अभिनेता निशांत सिंह मलकानीला दर आठवड्याला 2 लाख रुपये मिळतात.

– अभिनेत्री जास्मिन भसिनला दर आठवड्याला तब्बल तीन लाख रुपये मिळतात.

– तर बिग बॉसच्या घरात सर्वाधिक मानधन अभिनेत्री रुबिना दिलैकला मिळतं. दर आठवड्याला तिला पाच लाख रुपयेदिले जातात.

– सुरुवातीच्या काही भागातच घराबाहेर जाणाऱ्या शहनाज देओलला दर आठवड्यासाठी 50 हजार रुपये मानधन दिले जायचे. बिग बॉसच्या घरात हे सर्वांत कमी मानधन होते.

– ‘तुफानी सिनिअर्स’ सिद्धार्थ शुक्लाला एक आठवड्यासाठी 32 लाख, हीना खानला 25 लाख तर गौहर खानला 20 लाख रुपये दिले गेले होते.

(Bigg Boss 14 Contestants fees for per week episode)

यंदाच्या ‘बिग बॉस’चा सर्वाधिक गाजलेला वाद

वाद आणि बिग बॉस हे समीकरण तसं नवं नाही. मात्र, या 14व्या पर्वात सर्वाधिक गाजलेला वाद म्हणजे गायक कुमार सानूचं ‘मराठी’ भाषेवरील वक्तव्य. ‘बिग बॉस’च्या खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचे म्हटले होते. ‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला होता. राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसली होती. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे म्हटले होते.

जान कुमार सानूच्या या वक्तव्याचे पडसाद अवघ्या महाराष्ट्रात उमटले. अनेकांनी जान सानूवर सडकून टीका केली. यानंतर त्याने संपूर्ण महाराष्ट्राची आणि मराठी जनतेची जाहीर माफी मागितली होती. मात्र, तरीही हा वाढ अद्यापही धुमसत आहे.

इतक्या सगळ्या वादानंतरही जान कुमार सानूला या शोमधून हटवण्यात आले नाही. यानंतर हा शो स्क्रिप्टेड असल्याची बरीच चर्चा रंगली होती. शिवाय यातील प्रमाणापेक्षा अधिक आवाजात होणारे वाद, कारण नसताना झालेली हाणामारी आणि चर्चा एकंदरीत हे सगळं चित्र हा कार्यक्रम स्क्रिप्टेड असल्याचे दर्शवते. मात्र, अद्याप अशी कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

(Bigg Boss 14 Contestants fees for per week episode)

हेही वाचा :

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.