Bigg Boss 14 | ‘इम्युनिटी स्टोन’साठी ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांचे आयुष्य चव्हाट्यावर, नव्या रहस्यांनी प्रेक्षक स्तब्ध!

‘बिग बॉस 14’चा (Bigg Boss 14) एक प्रोमो समोर आला असून, तो प्रोमो बघितल्यानंतर प्रेक्षकांना मोठा धक्काच बसला आहे आणि या प्रोमोची चर्चा सर्वत्र रंगली आहे

Bigg Boss 14 | ‘इम्युनिटी स्टोन’साठी ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांचे आयुष्य चव्हाट्यावर, नव्या रहस्यांनी प्रेक्षक स्तब्ध!
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 3:57 PM

मुंबई :बिग बॉस 14’चा (Bigg Boss 14) एक प्रोमो समोर आला असून, तो प्रोमो बघितल्यानंतर प्रेक्षकांना मोठा धक्काच बसला आहे आणि या प्रोमोची चर्चा सर्वत्र रंगली आहे. ‘इम्युनिटी स्टोन’ मिळवण्यासाठी घरातील सदस्य त्यांच्या आयुष्यातील, अद्याप कोणालाही माहिती नसलेली रहस्ये उघड केली आहेत. त्यामध्ये रूबीना, अभिनव, एजाज खान, निक्की तंबोली, जास्मीन आणि अली धक्कादायक खुलासे करताना दिसत आहेत. (Bigg Boss 14 Immunity Stone Task)

प्रोमोमध्ये एजाज खान सांगताना दिसत आहे की, ‘मी जे सांगत आहे ते, फक्त मला आणि माझ्या थेरपिस्टला माहित आहे. माझ्या वडिलांना देखील हे माहिती नाही. त्यासाठी मी अगोदर त्यांची माफी मागतो’, असे एजाज बोलताना दिसत आहे. हे सांगताना एजाज रडताना दिसत आहे.

रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे दोघे नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार होते, असा धक्कादायक खुलासा रुबीनाने केला आहे. ही गोष्ट रुबीनाने नॅशनल टीव्हीवर सर्वांसमोर शेअर केली आहे आणि रूबीना सांगते की, मी आणि अभिनवने ऐकमेकांना नोव्हेंबरपर्यंत वेळ दिला होता आणि हेच कारण होते की आम्ही बिग बॉसमध्ये आलो. हे सर्व सांगताना रूबीना रडताना दिसली. ‘इम्युनिटी स्टोन’ मिळवण्यासाठी बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी आपआपली रहस्ये उघड केली आहेत. मात्र प्रोमोमध्ये इम्युनिटी स्टोन एजाज खानला मिळालेला दिसत आहे. गेल्या आठवड्यातील एकता कपूरने ‘इम्युनिटी स्टोन’ रूबीनाला दिला होता. ज्याच्या सहाय्याने रूबीना एकदा नॉमिनेशन प्रक्रियेतून सुरक्षित राहु शकत होती. परंतु रुबीनाने अद्याप इम्युनिटी स्टोन वापरला नाही. काल बिग बॉसने रुबीनाला इम्युनिटी स्टोनचा वापर करण्याविषयी विचारले होते. मात्र, तिने इम्युनिटी स्टोन वापरण्यास नकार दिला होता.

अलीने बिग बॉसने दिलेल्या बॉक्सला लाथ मारल्यामुळे कविताला राग आला होता. कविता बिग बॉसला म्हणते की, अशा हिंसक वातावरणात मी घरात राहू शकत नाही. त्याचवेळी रुबीना कविताला बोलण्यासाठी जाते. त्यावेळी कविता रुबिनाला सांगते की, अभिनव आणि मी फ्रेंड्स विथ बेनिफिट होतो. तुला कदाचित अभिनवने कधी सांगितले नसेल. त्यावेळी रूबीना कविताला म्हणते मला माहिती आहे. मात्र, हे ऐकून घरातील इतर सदस्यांना धक्का बसला होता. रूबीना अभिनवला म्हणते की, तु मला कधी सांगितले नाही की, तु आणि कविती फ्रेंड्स विथ बेनिफिट होतात. यावरून अभिनव आणि रूबीनामध्ये वाद झाला होता.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | रुबीना-अभिनव नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार? ‘बिग बॉस’च्या घरात खळबळजनक दावा!

Bigg Boss 14 | बिग बॉस घरातील ‘व्हिलन’ ठरल्या रूबीना, निक्की आणि जास्मीन

(Bigg Boss 14 Immunity Stone Task)

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.