Bigg Boss 14 | ‘पंजाबी जीजा’ सिद्धार्थनेच सारा गुरपालला ‘बिग बॉस’च्या घराबाहेर काढले!

पहिल्याच आठवड्यात या खेळातून सारा गुरपाल  बेघर झाली आहे. तूफानी सिनिअर सिद्धार्थ शुक्लानेच साराला घराबाहेर केले आहे.

Bigg Boss 14 | ‘पंजाबी जीजा’ सिद्धार्थनेच सारा गुरपालला ‘बिग बॉस’च्या घराबाहेर काढले!
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 11:59 AM

मुंबई :बिग बॉस 14’च्या घरात आठवड्याच्या सुरुवातीलाच गोंधळ सुरू झालेला पाहायला मिळाला. सोमवारी (12 ऑक्टोबर) घरातील पहिले एलिमिनेशन पार पडले आहे. शनिवार आणि रविवारच्या ‘बिग बॉस विकेंड वार’मध्ये पहिल्या दिवशी सलमान खानने स्पर्धकांचे कौतुक केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशीच्या भागात त्याने नव्या स्पर्धकांना पद्धतशीर खेळण्याचा इशारा दिला होता. असे न केल्यास पुढच्या 2 आठवड्यात घराबाहेर पडावे लागेल, असाही इशारा त्याने दिला होता. दरम्यान, पहिल्याच आठवड्यात या खेळातून सारा गुरपाल  बेघर झाली आहे. तूफानी सिनिअर सिद्धार्थ शुक्लानेच साराला घराबाहेर केले आहे. (Bigg Boss 14 latest Update First Nomination Task sara gurpal Eliminated)

‘विकेंड का वार’मध्येच सलमानने स्पर्धकांना आपापल्या बॅगा भरून घराबाहेर पडण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतर तो भाग संपत आल्याने नेमके घराबाहेर कोण जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. या सगळ्या स्पर्धकांपैकी पंजाबी अभिनेत्री सारा गुरपाल ‘बिग बॉस’च्या या पर्वाच्या घराबाहेर पडणारी पहिली स्पर्धक ठरली आहे. सिद्धार्थच्या दाबावानंतर तूफानी सिनिअर्सनी एकमताने साराला घराबाहेर करण्याचा निर्णय घेतला.

स्पर्धकांनीच केले एकमेकांना नॉमिनेट

घरातून बेघर करण्याच्या या टास्कमध्ये सगळ्या नव्या स्पर्धकांना प्रत्येकी दोन नावे बिग बॉसला सांगायची होती. त्यानुसार, निशांत मलकानीने शहजाद आणि राहुल वैद्य, एजाज खानने राहुल वैद्य आणि निशांत मलकानी, अभिनव शुक्लाने राहुल वैद्य आणि निशांत मलकानी, जास्मीनने निशांत मलकानी आणि जान सानू, जान सानूने सारा गुरपाल आणि राहुल वैद्य, रुबिनाने निशांत आणि एजाज, पवित्रा पुनियाने राहुल आणि एजाज, राहुल वैद्यने अभिनव आणि निशांत, शहजादने निशांत आणि जान, सारा गुरपालने जान आणि राहुल तर, निक्की तंबोलीने अभिनवला नॉमिनेट केले.( Bigg Boss 14 latest Update First Nomination Task sara gurpal Eliminated)

साराला घराबाहेर करण्याचा निर्णय सिद्धार्थचा

या घरात नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचा टास्क बिग बॉसने तूफानी सिनिअर्सवर सोपवला. यावेळी हीना खान आणि गौहर खान गोंधळलेल्या दिसल्या. मात्र, सिद्धार्थने सुरुवातीपासून साराचे नाव लावून धरले होते. अखेर तिघांच्या एकमताने साराला घराबाहेर करण्यात आले.

सारा गुरपाल बिग बॉसच्या घरात सक्रिय नसल्याचे म्हणत सलमानने तिला बोल देखील लावले होते. तर, तिच्या घरातील सहकार्यावर तूफानी सिनिअर्सदेखील नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळाले. एका टास्क दरम्यान साराला ‘इसमे वो बात नही’ या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले होते.( Bigg Boss 14 latest Update First Nomination Task sara gurpal Eliminated)

बिग बॉसच्या घरात पंजाबी तडका

दरवर्षी बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात एका तरी पंजाबी चेहऱ्याला संधी दिली जाते. गेल्या पर्वात पंजाबच्या हिमांशी खुराना आणि शहनाझ गिलने घराला ‘पंजाबी’ तडका लावला होता. या दोघीही स्पर्धेत फार काळ टिकल्या होत्या. सारा गुरपाल पंजाबमध्ये हिमांशी आणि शहनाझपेक्षा प्रसिद्ध असल्याने तिला संधी देण्यात आली होती. प्रेक्षकांच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा देखील वाढल्या होत्या. परंतु, पहिल्याच आठवड्यात प्रेक्षक तिच्यावर नाराज असल्याचे चित्र दिसले.

संबंधित बातम्या :

‘बिग बॉस’च्या घरात पहिले एलिमिनेशन, सारा गुरपाल घराबाहेर जाणार?

Bigg Boss 14 | तूफानी सिनिअर्सला मोठी टक्कर, निक्की तंबोलीकडे घराचे ‘विशेषाधिकार’!

(Bigg Boss 14 latest Update First Nomination Task sara gurpal Eliminated)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.