Bigg Boss 14 Promo | अली आणि निक्कीच्या कृत्याची शिक्षा भोगणार संपूर्ण घर!
बिग बॉस 14 (Bigg Boss 14) च्या घरात एकामागून एक अनेक ट्विस्ट येत आहेत.
मुंबई : बिग बॉस 14 (Bigg Boss 14) च्या घरात एकामागून एक अनेक ट्विस्ट येत आहेत. चॅलेंजर्स घरात आल्यापासून बिग बॉसच्या घरात एक नवीन नाटक पाहायला मिळालं आहे. आज सोमवारच्या एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरात बराच मोठा हंगामा बघायला मिळणार आहेत. कलर्स वाहिनीने नुकताच आजच्या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रोमोमध्ये विकास गुप्ता रडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये विकास गुप्ता कुणाबद्दल तरी बोलत आहे. (Bigg Boss 14 New twist in Bigg Boss’s house)
अली गोनी आणि निक्की तांबोळी यांनाही बिग बॉस कडून कठोर शिक्षा मिळणार आहे. कारण त्यांनी घराच्या महत्त्वपूर्ण नॉमिनेशन प्रक्रियेचा मज्जाक उडवला आहे. निक्की आणि अली ही मज्जाक घरातील सर्वच सदस्यांना भारी पडणार आहे. बिग बॉसने घरातील इतर सदस्यांना सांगितले की, त्यांनी केलेल्या चुकीचे सजा तुम्हाला सर्वांना भेटणार आहे. त्यानंतर घरातील इतर सदस्य निक्की आणि अलीला भांडताना दिसत आहेत.
Aaj nominations task lega ek aisa modh jo layega gharwalon ke beech ek naya bhoochaal! Dekhiye aaj raat 10:30 baje.
Catch it before TV on @VootSelect @BeingSalmanKhan #BiggBoss #BiggBoss2020 #BiggBoss14 #BB14 pic.twitter.com/zK6cEVT2LT
— Bigg Boss (@BiggBoss) December 28, 2020
विकास गुप्ता आणि अर्ची खानमध्ये भांडणे झाली होती. यावेळी अर्शी खानने विकास गुप्ता यांच्या आईवर भाष्य केले होते, त्यानंतर विकासने तिला पाण्यात ढकलले होते. अर्शीला पाण्यात ढकल्यामुळे विकास गुप्ताला बिग बॉसच्या घरातून बेघर देखील व्हावे लागले आहे.
मात्र, त्यानंतर सलमान खान अर्शीची क्लास घेतला, तु विकास गुप्ताच्या आईबद्दल बोललीस आणि कोणी माझ्या आईबद्दल असे बोलले असते तर कदाचित मी सुध्दा तेच केले असते जे विकास गुप्ताने केले. त्याचबरोबर सलमान घरातील इतर सदस्यांना विचारतो की, जर अर्शी तुमच्या आईबद्दल अशी बोलली असती तर तुम्ही काय केले असते. त्यावर राखी सावंत म्हणते की, माझ्या आईबद्दल बोलले असते तर तिचा गळा मी दाबला असता, रूबीना म्हणते की, मी तिच्या कानाखाली जाळ काढल्या असता आणि स्वत: बिग बॉसच्या घराबाहेर गेले असते.
यासर्व प्रकरणावर अर्शी म्हणते की, मी विकास गुप्ताच्या आईबद्दल काहीही वाईट बोलले नाही. आणि ती मोठमोठ्याने ओरडत असते त्यावेळी तिला सलमान खान रागवतो देखील अर्शी म्हणते की, आता मला बिग बॉसच्या घरात राहायचे नाही असे म्हणत ती उठून जाते. यावेळी सलमान म्हणतो की, कोणाच्याही आई-वडीलांबद्दल चुकीचे बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही.
संबंधित बातम्या :
Bigg Boss 14 | ‘बिग बॉस 14’च्या घरात एकता कपूरची धमाकेदार एंट्री, नवा ट्विस्ट खेळ बदलणार!
Bigg Boss 14 | बिग बॉसच्या घराचे दोन भागात विभाजन, घरात पुन्हा एकदा हंगामा
(Bigg Boss 14 New twist in Bigg Boss’s house)