Bigg Boss 14 | निक्की तांबोळी बिग बॉसच्या घरातून आऊट, राखी सावंत आणि विकास गुप्ता घरातील सदस्यांना देणार चॅलेंज
यावर्षी ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) च्या पर्वाची सुरुवात 3 ऑक्टोबरपासून झाली होती. मात्र, सुरूवातीचे काही आठवडे म्हणावे तेवढे खास गेले नाहीत. परंतु, हळूहळू ‘बिग बॉस 14’ने वेगाने चर्चेत येण्यास सुरुवात केली.
मुंबई : यावर्षी ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) च्या पर्वाची सुरुवात 3 ऑक्टोबरपासून झाली होती. मात्र, सुरूवातीचे काही आठवडे म्हणावे तेवढे खास गेले नाहीत. परंतु, हळूहळू ‘बिग बॉस 14’ने वेगाने चर्चेत येण्यास सुरुवात केली. दरम्यान, बरेच ट्विस्ट आणि मनोरंजक वळणे सध्या ‘बिग बॉस 14’मध्ये पाहायला मिळत आहेत. वीकेंड का वारच्या सुरवातीला सलमान खान घरातील सदस्य राहुल वैद्यला फटकारताना दिसला. (Bigg Boss 14 | Nikki Tamboli out of Bigg Boss’s house)
#BiggBoss is going down the memory lane. Ab sab hone wale hai bhavuk. #BB14 #BiggBoss2020 #BiggBoss14 @BeingSalmanKhan #WeekendKaVaar pic.twitter.com/4n360wzZNh
— ColorsTV (@ColorsTV) December 5, 2020
राहुलला सलमान खान विचारतो की, बिग बॉसचा फायनलिस्ट म्हणून अभिनव शुक्ला तुला योग्य का वाटत नाही? यावर राहुल म्हणाला की, अभिनवचे व्यक्तिमत्त्व मला प्रभावी दिसत नाही. यामुळे तो बिग बॉसचा फायनलिस्ट दिसत नाहीत. राहुलचे हे उत्तर ऐकल्यानंतर सलमान खान म्हणतो की, अभिनव शुक्ला मेहनत करून फायनलिस्ट बनला आहे. तु टास्कमध्ये मेहनत केली नाही. मग तु अभिनवला नाव ठेऊ शकत नाहीस. सलमान खानने निक्की तांबोळीला राहुल वैद्यच्या कामगिरीबद्दल विचारले. त्यावेळी निक्की म्हणाली की, शार्क टास्कमध्ये राहुलची कामगिरी खूपच खराब होती.
अभिनव शुक्लाबद्दल बोलताना सलमान खान घरातील सदस्यांना म्हणाला, तुमची सर्वात मोठी चूक ही आहे की, अभिनव शुक्लाला तुम्ही कधीच एक स्पर्धेक म्हणून पाहिले नाही. म्हणूनच तो आज फायनलिस्ट आहे. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना थिएटर रूममध्ये बोलावले जाते आणि त्यांच्या चांगल्या-वाईट आठवणी पडद्यावर दाखविल्या जातात. त्यांना कोणत्या आठवणी पुसून टाकायच्या आहेत आणि कोणत्या आठवणी घरी घेऊन जायच्या आहेत, असे बिग बॉस विचारतात. त्यावर अभिनव शुक्ला, निक्की तांबोळी, जास्मीन भसीन, एजाज खान, रुबीना दिलैक आणि राहुल वैद्य त्यांच्या आठवणी पाहून खूप भावूक होतात. प्रत्येकजण आपल्या वाईट आठवणींना मिटवतो.
.@rahulvaidya23 ko @ashukla09 ka vyaktitva asardaar nahin lagta. Tell us what you think in the comments! #BB14 #BiggBoss2020 #BiggBoss14 @BeingSalmanKhan #WeekendKaVaar pic.twitter.com/gef20g1l79
— ColorsTV (@ColorsTV) December 5, 2020
अभिनव-रुबीना घटस्फोट घेणार नाहीत या आठवड्यात कॉलर ऑफ द वीकमध्ये अभिनव शुक्लाला त्याच्या आणि रुबीना दिलैकच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला जातो. त्यावर उत्तर देताना अभिनव म्हणाला की, आम्ही दोघे घटस्फोट घेणार नाहीत. बिग बॉसच्या घरातील भांडणे बघितल्यावर लक्षात आले की, त्या पुढे आमची काहीच भांडणे होत नाहीत. प्रेक्षकांची मते कमी मिळाल्यामुळे या आठवड्यात घरातुन निक्की तांबोळी बेघर झाली आहे. पण त्यावेळी सलमान खानने निक्कीचे खूप कौतुक केले. घरातील सर्व सदस्यांनी निक्कीला मिठी मारून निरोप दिला त्यावेळी निक्कीही भावुक झाली होती. बिग बॉसच्या घरात चैलेंजर्स म्हणून विकास गुप्ता आणि राखी सावंत आले आहेत. सलमान खानने दोघांचेही स्वागत केले. बिग बॉसकडून विकासला 5 आव्हाने देण्यात आली आहेत. त्यापैकी 3 आव्हाने त्याला पूर्ण करावी लागली आहेत.
संबंधित बातम्या :
Bigg Boss 14 | सलमान खान राहुल वैद्यला म्हणाला, ‘गेट आऊट’, राहुल खरंच बिग बॉसचे घर सोडून जाणार?
Big Boss 14 | कविता कौशिकच्या पतीचा ‘बिग बॉस’ स्पर्धकावर आरोप, अभिनववर अप्रत्यक्ष निशाणा
(Bigg Boss 14 | Nikki Tamboli out of Bigg Boss’s house)