प्रेग्नंसीदरम्यान रुबिना दिलैकचा भयानक अपघात; अभिनेत्रीने सांगितली घटना

अभिनेत्री रुबिना दिलैक लवकरच जुळ्या मुलांची आई होणार आहे. ऑगस्ट महिन्यात अभिनव आणि रुबिनाने चाहत्यांना गरोदरपणाबाबतची गुड न्यूज दिली होती. त्यानंतर आता रुबिनाने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट करत प्रेग्नंसीदरम्यान झालेल्या अपघाताची घटना सांगितली आहे.

प्रेग्नंसीदरम्यान रुबिना दिलैकचा भयानक अपघात; अभिनेत्रीने सांगितली घटना
Rubina DilaikImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 9:26 AM

मुंबई : 29 नोव्हेंबर 2023 | ‘बिग बॉस 14’ची विजेती आणि टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. अभिनव शुक्ला आणि रुबिना दिलैक हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. ऑगस्ट महिन्यात रुबिनाने चाहत्यांना ही गोड बातमी दिली. त्यानंतर आता तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तिने सांगितलंय की ती जुळ्या मुलांची किंवा मुलींची आई होणार आहे. याच मुलाखतीत रुबिनाने तिच्या अपघाताचा किस्सा सांगितला. तीन महिन्यांची गरोदर असताना रुबिना आणि अभिनवच्या कारचा अपघात झाला होता.

व्हिडीओत रुबिना सांगते, “जेव्हा आम्हाला समजलं की आम्ही जुळ्या मुलांचे आई-वडील होणार आहोत, तेव्हा अभिनवला आश्चर्याचा धक्काच बसला होता. आम्ही दोघं गाडीत संपूर्ण वेळ एकमेकांशी बोललो नाही. आम्ही खुश नव्हतो, अशी बाब नव्हती. फक्त हे खरंच असं होणार आहे का, यावर आमचा विश्वास बसत नव्हता. डॉक्टरांनी मला तीन महिन्यांपर्यंत ही गुड न्यूज कोणालाच न सांगण्यास सांगितली होती. तीन महिन्यांनंतर जेव्हा तपासणी झाली, तेव्हा सोनोग्राफीदरम्यान जुळ्या मुलांना पाहून आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही खूप खुश आहोत.”

हे सुद्धा वाचा

याच तपासणीनंतर घरी परतत असताना अभिनव आणि रुबिनाच्या कारचा अपघात झाला होता. याविषयी ती पुढे म्हणाली, “सोनोग्राफीनंतर आम्ही जेव्हा घरी जात होतो, तेव्हाच आमच्या कारचा अपघात झाला. मागून एका ट्रकची धडक आमच्या कारला लागली. त्यावेळी माझ्या डोक्याला आणि पाठीला धक्का लागला होता. ती घटना आठवल्यानंतर आजसुद्धा मला खूप भीती वाटते. माझ्यासाठी तो काळ खूप वाईट होता. त्यानंतर आम्ही इमर्जन्सी सोनोग्राफी केली. दोन्ही बाळ ठीक आहेत का, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं होतं. पण देवाच्या कृपेने सर्वकाही ठीक होतं. आजसुद्धा जेव्हा मला ती घटना आठवते, तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके वाढतात.”

रुबिना आणि अभिनवने 2018 मध्ये लग्न केलं. या दोघांनी बिग बॉसच्या 14 व्या पर्वात स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. ऑक्टोबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत हा शो सुरू होता. या सिझनची विजेती रुबिना ठरली होती. राहुल वैद्य, निक्की तांबोळी आणि अली गोणी यांचा पराभव करत रुबिनाने विजेतेपद पटकावलं होतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.