बिग बॉसचा सोळावा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये होणारा ड्रामा प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करतोय. यात कधी स्पर्धकांमध्ये जोरदार भांडण होतं तर काही स्पर्धक एकमेकांच्या प्रेमात पडतात. या स्पर्धकांना एका आठवड्यासाठी तिची मानधन मिळतं, ते जाणून घेऊयात..
रॅपर एमसी स्टॅनला दर आठवड्याचे सात लाख रुपये मिळतात. त्याचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
यंदाच्या सिझनमध्ये अंकित गुप्ताने चांगलीच छाप सोडली आहे. तो हा शो जिंकणार की नाही हे येत्या काळातच कळू शकेल. मात्र बिग बॉसच्या एका आठवड्यासाठी त्याला पाच ते सात लाख रुपये मानधन दिलं जातंय.
शिव ठाकरेने बिग बॉस मराठीतून आधी लोकप्रियता मिळवली. या शोचा विजेता झाल्यानंतर त्याने हिंदी बिग बॉसमध्ये भाग घेतला. इथे त्याला एका आठवड्यासाठी पाच लाख रुपये मिळतात.
साजिद खान हे यंदाच्या सिझनमधील मोठं नाव आहे. मात्र त्याची कमाई जास्त नाही. साजिदला दर आठवड्याला पाच लाख रुपये मानधन मिळतं.
यंदाच्या सिझनमधील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धक म्हणजे अब्दु रोझिक. सध्या तो एका प्रोजेक्टनिमित्त शोच्या बाहेर गेलाय. मात्र त्याला बिग बॉसमध्ये असताना एका आठवड्यासाठी तीन ते चार रुपये मिळायचे.
मानधनाच्या बाबतीत प्रियांका चहर चौधरीसुद्धा इतरांपेक्षा मागे नाही. रिपोर्ट्सनुसार, प्रियांकाला आठवड्यात जवळपास पाच ते सात लाख रुपये मिळतात.
ईमली मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुंबुल तौकीर खान ही या सिझनमधील सर्वांत महागड्या स्पर्धकांपैकी एक आहे. तिला दर आठवड्याला जवळपास बारा लाख रुपये मिळतात.
अब्दु रोझिकसोबतच्या मैत्रीमुळे चर्चेत आलेली निम्रत कौर आहलुवालिया या शोमध्ये अद्याप टिकून आहे. तिला दर आठवड्याला जवळपास आठ लाख रुपये मानधन मिळतं.
टीना दत्ता हे छोट्या पडद्यावरील मोठं नाव आहे. बिग बॉसमध्येही ती खूप चर्चेत आहे. टिनाला जवळपास आठ ते नऊ लाख रुपये मिळतात.