Sajid Khan: 15 व्या वर्षी जेल, दहावीत 3 वेळा नापास; असं आहे ‘बिग बॉस 16’चा स्पर्धक साजिद खानचं आयुष्य

Bigg Boss 16 मध्ये साजिदच्या एण्ट्रीने प्रेक्षकांना बसला आश्चर्याचा धक्का

Sajid Khan: 15 व्या वर्षी जेल, दहावीत 3 वेळा नापास; असं आहे 'बिग बॉस 16'चा स्पर्धक साजिद खानचं आयुष्य
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 1:34 PM

सलमान खानच्या ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) या सर्वांत चर्चेत असलेल्या शोचा शनिवारी ग्रँड प्रीमिअर पार पडला. बिग बॉसच्या घरात सहभागी होणाऱ्या काही स्पर्धकांची ओळख सलमानने करून दिली. वकीलपासून डॉक्टरपर्यंत, इंजीनिअरपासून मिस इंडिया आणि अभिनेत्यापर्यंत अनेक स्पर्धक यंदाच्या सिझनमध्ये सहभागी झाले आहेत. या सर्वांत दिग्दर्शक साजिद खानच्या (Sajid Khan) एण्ट्रीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. गेल्या चार वर्षांपासून साजिदला कोणतंच काम मिळालं नाही. साजिदवर ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत अनेक अभिनेत्रींनी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या साजिद खूपच चर्चेत आहे.

बिग बॉस 16 च्या स्टेजवर पोहोचल्यानंतर साजिदने गेल्या चार-वर्षांचा काळ, यशामुळे आलेला अहंकार, फ्लॉप चित्रपट यांविषयी मोकळेपणाने भाष्य केलं.

हे सुद्धा वाचा

“गेल्या चार वर्षांपासून मी काम नसल्याने घरीच बसलोय. मी माझ्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. अनेकांना अपयश उद्ध्वस्त करतं. पण माझ्या बाबतीत यशानेच मला उद्ध्वस्त केलं. मी खूप अहंकारी बनलो होतो. बॅक-टू-बॅक तीन हिट चित्रपट दिले होते. त्यामुळे मी अहंकारात बुडालो होतो”, अशी कबुली साजिदने सलमानसमोर दिली.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

हिम्मतवाला आणि हमशक्ल हे लागोपाठ दोन चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर साजिदकडून हाऊसफुल 4 चे क्रेडीट काढून घेतले गेले. अर्धा चित्रपट दिग्दर्शित केल्यानंतर त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. या सर्व घटना घडल्यानंतर स्वत:चं आत्मपरिक्षण करण्यासाठी बिग बॉसच्या घरात येण्याचा निर्णय घेतल्याचं साजिदने स्पष्ट केलं.

साजिद 6 वर्षांचा होता, तेव्हा त्याचे आईवडील विभक्त झाले. फिल्मी करिअरमध्ये अपयशाला सामोरं गेल्यानंतर साजिदचे वडील व्यसनाधीन झाले. साजिद जेव्हा 14-15 वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या वडिलांचं निधन झालं. साजिदच्या अभ्यासावर या सर्व गोष्टींचा परिणाम झाला. दहावीत तो तीन वेळा नापास झाला.

एका घटनेत साजिदला तुरुंगातही जावं लागलं होतं. मित्रासोबत चित्रपट पाहायला गेलेल्या साजिदने घरी येताना रेल्वे ट्रॅकवरून चालायचा हट्ट केला. मित्रासोबत रेल्वे रुळावरून चालत असताना एका हवालदाराने त्या दोघांना पकडलं आणि तुरुंगात डांबलं. ती रात्र साजिदला तुरुंगात घालवावी लागली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.