Shiv Thakare | “जेवढं प्रेम करायचं होतं ते..”; शिव ठाकरेनं रिलेशनशिप स्टेटसबद्दल केला खुलासा

शिव ठाकरेचं अभिनेत्री वीणा जगतापशी नाव जोडलं गेलं होतं. जेव्हा या दोघांचं ब्रेकअप झालं तेव्हा त्यांच्या चाहत्यांमध्येही सोशल मीडियावर खडाजंगी झाली होती. त्यामुळे भविष्यात रिलेशनशिपमध्ये असल्यावर ते माध्यमांपासून लपवणार का, असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला..

Shiv Thakare | जेवढं प्रेम करायचं होतं ते..; शिव ठाकरेनं रिलेशनशिप स्टेटसबद्दल केला खुलासा
Shiv ThakareImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 2:59 PM

मुंबई : एकानंतर एक तीन शोजनंतर अभिनेता शिव ठाकरे पुन्हा एकदा नव्या रिॲलिटी शोसाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच ‘खतरों के खिलाडी’ या रिॲलिटी शोमध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी त्याने दोन मराठी चित्रपटांचेही ऑफर्स नाकारल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिव ठाकरे त्याच्या करिअरविषयी आणि रिलेशनशिप स्टेटसविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

“मला चित्रपटांचे ऑफर्स मिळाले होते. पण मी ते नाकारले. मोठ्या दिग्दर्शकाकडून ही ऑफर आली होती. दोन्ही चित्रपटांचे शूटिंग एप्रिलमध्ये सुरू होणार होते आणि मे महिन्याच्या अखेरपर्यंत संपणार होते. पण मी खतरों के खिलाडी या शोची ऑफर स्वीकारल्याने माझ्या तारखा त्यावेळी उपलब्ध नव्हत्या. मला त्या शोविषयीची ओढ जास्त होती, म्हणून चित्रपटांना नाकारण्याचा निर्णय मी घेतला”, असं शिवने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“कॅमेरासमोर मी जसा आहे तसाच वागतो, त्यामुळे प्रेक्षकांकडून मला खूप पाठिंबा मिळतो. सध्या मी माझ्या हिंदी भाषेवर अधिक मेहनत घेत आहे. अमरावतीच्या गल्ल्यांमधून इथपर्यंत पोहोचलोय तर याचा अर्थ असाच आहे की मी योग्य मार्गावर आहे. मला आणखी थोडी मेहनत करण्याची गरज आहे. आज नाही तर पाच वर्षांनी किंवा नंतर कधीतरी मी चित्रपटात काम नक्कीच करेन. माझ्यासाठी भाषा महत्त्वाची नाही. महाराष्ट्रीयन असल्याने मला मराठी चित्रपट करायला आवडेल. पण ते फक्त महाराष्ट्रापुरतंच मर्यादित असेल. हिंदी चित्रपटात काम केल्यावर मी संपूर्ण भारतात पोहोचेन. मी मराठी चित्रपट करेनच पण बॉलिवूड हे बॉलिवूडच आहे”, असंही त्याने स्पष्ट केलं.

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

या मुलाखतीत शिव ठाकरे त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दलही व्यक्त झाला. “मी सध्या माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं आहे आणि तेच एकमेव प्रेम सध्या माझ्या आयुष्यात आहे. जेवढं प्रेम करायचं होतं, तेवढं कॉलेजच्या दिवसांमध्ये केलं. आता माझं करिअर उभं करण्याची वेळ आली आहे.”

शिव ठाकरेचं अभिनेत्री वीणा जगतापशी नाव जोडलं गेलं होतं. जेव्हा या दोघांचं ब्रेकअप झालं तेव्हा त्यांच्या चाहत्यांमध्येही सोशल मीडियावर खडाजंगी झाली होती. त्यामुळे भविष्यात रिलेशनशिपमध्ये असल्यावर ते माध्यमांपासून लपवणार का, असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “माझं आयुष्य हे खुल्या किताबाप्रमाणे आहे. प्रेम करेन तर खुल्लमखुल्ला करेन. लोक माझ्याबद्दल किंवा माझ्या प्रेमाबद्दल काय बोलतात, याने मला फरक पडत नाही. मी अशा गोष्टींना घाबरत नाही. ”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.