Bigg Boss 16: सगळ्यांसमोर इंटिमेट झाले गौतम-सौंदर्या; अब्दुने उडवली खिल्ली
बिग बॉसच्या घरात गौतम-सौंदर्याचा खुल्लम खुल्ला रोमान्स
मुंबई- ‘बिग बॉस 16’च्या प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांना रोमान्सचा तडका पहायला मिळतोय. एकीकडे टीना दत्ता आणि शालीन भनोत हळूहळू एकमेकांच्या जवळ येत आहेत. तर दुसरीकडे गौतम विज आणि सौंदर्या शर्मा यांच्यातील जवळीक जरा जास्तच वाढली आहे. कलर्स टीव्हीने नुकताच नव्या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये गौतम आणि सौंदर्या हे पुन्हा एकदा इंटिमेट होताना दिसत आहेत.
या प्रोमो व्हिडीओमध्ये सौंदर्या आणि गौतम एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत. तर दुसरीकडे नव्याने बनलेला कॅप्टन अब्दू रोझिक हा शिव ठाकरेसोबत मिळून त्या दोघांची खिल्ली उडवताना दिसतोय. सौंदर्याची नक्कल करत अब्दुसुद्धा शिवच्या मांडीवर बसतो आणि म्हणतो, “दोघं एकमेकांना मिस करत आहेत. दोन-तीन तासांनंतर पुन्हा बाथरुममध्ये जाऊन किस करणार.” यानंतर अब्दु शिवला किस करत असल्याची नक्कल करतो.
View this post on Instagram
दोघं नंतर बराच वेळ गौतम आणि सौंदर्याकडे वाकून-वाकून बघू लागतात. शिवसुद्धा गौतमसारखा अभिनय करत दोघांची मस्करी करतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी गौतम-सौंदर्याची तुलना ईशान आणि मायशा यांच्याशी केली. बिग बॉसचा शो संपताच हे दोघं ब्रेकअप करतील, असा अंदाज नेटकरी वर्तवू लागले.
याआधी सलमान खाननेही सौंदर्यासमोर गौतमची पोलखोल केली होती. घरातील इतर स्पर्धक या दोघांच्या नात्याला बनावट आणि खोटं सांगत होते. त्याचदरम्यान सलमाननेही सौंदर्याला गौतमची एक क्लिप दाखवली होती. या क्लिपनंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं. मात्र आता पुन्हा एकदा हे दोघं एकमेकांच्या जवळ आले आहेत.