Bigg Boss 16 | बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच निमृत बनली कोट्यधीश; निर्मात्यांकडून घेतली मोठी रक्कम

निमृत कौर ही बिग बॉसच्या घरात पोहोचताच कॅप्टन बनली होती. पहिल्या आठवड्यात तिने कमाल केली. मात्र त्यानंतर प्रेक्षकांकडून तक्रारी येऊ लागल्या की ती कुठेच दिसत नाही. निमृत शोमध्ये फार दिसली असो किंवा नसो मात्र तिने बिग बॉस 16 च्या निर्मात्यांकडून तगडी रक्कम वसूल केली आहे.

Bigg Boss 16 | बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच निमृत बनली कोट्यधीश; निर्मात्यांकडून घेतली मोठी रक्कम
Bigg Boss 16 | बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच निमृत बनली कोट्यधीशImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 5:15 PM

मुंबई: बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेच्या सहा दिवस आधीच संपूर्ण खेळ पलटला आहे. बिग बॉसच्या घरात आलेल्या प्रेक्षकांनी सर्वांत कमी मतं देऊन निमृत कौर आहलुवालियाला शोमधून काढून टाकलं आहे. नुकतंच या शोमधून सुंबुल तौकिर खान बाहेर पडली होती. त्यानंतर आता निमृतसुद्धा बाद झाल्याने बिग बॉसच्या खेळीत नवा ट्विस्ट आला आहे. निमृत कौर ही बिग बॉसच्या घरात पोहोचताच कॅप्टन बनली होती. पहिल्या आठवड्यात तिने कमाल केली. मात्र त्यानंतर प्रेक्षकांकडून तक्रारी येऊ लागल्या की ती कुठेच दिसत नाही. निमृत शोमध्ये फार दिसली असो किंवा नसो मात्र तिने बिग बॉस 16 च्या निर्मात्यांकडून तगडी रक्कम वसूल केली आहे.

बिग बॉसच्या घरात 18 दिवस राहिल्यानंतर निमृत कोट्यधीश झाली आहे. छोट्या पडद्यावरील ‘छोटी सरदारनी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या निमृतने बिग बॉसच्या माध्यमातून दणक्यात कमाई केली आहे.

हे सुद्धा वाचा

इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, निमृत कौर दर आठवड्याला आठ ते नऊ लाखदरम्यान फी स्वीकारत होती. जर सर्वसामान्यपणे साडेआठ लाख रुपये फी घेतली असेल तर 18 आठवड्यांच्या हिशोबाने ही रक्कम 1 कोटी 53 लाखांच्या घरात पोहोचते. बिग बॉसचा शो जेव्हा सुरू झाला होता तेव्हा घरात सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक सुंबुल तौकिर खान होती. ती दर आठवड्याला 11 लाख रुपये मानधन घ्यायची. मात्र शोमधील तिचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर निर्मात्यांची तिची फी कमी केली.

बिग बॉस 16 मुळे निमृतला फक्त पैशांचाच फायदा झाला नाही तर तिला दिबाकर बॅनर्जी आणि एकता कपूर यांच्या ‘एलएसडी 2’ या चित्रपटात मुख्य भूमिकासुद्धा मिळाली. छोटी सरदारनी या मालिकेत निमृतने भूमिका साकारली होती. मात्र बिग बॉस 16 मध्ये आल्यानंतर तिला खरी प्रसिद्धी मिळाली.

बिग बॉसच्या घरातून निमृत कौर आहलुवालिया बाहेर पडल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. मात्र याची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. मात्र निमृत गेल्यानंतर घरात शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, एमसी स्टॅन, अर्चना गौतम आणि शालीन भनोट हे पाच स्पर्धक राहणार आहेत.

बिग बॉसच्या 14 व्या सिझनची विजेती रुबिना दिलैकला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता की यंदाच्या सिझनची ट्रॉफी कोणता स्पर्धक पटकावू शकतो? त्यावर तिने प्रियांका चहर चौधरी आणि शिव ठाकरे या दोघांमध्ये तगडी चुरस रंगणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर बिग बॉसची 15 व्या सिझनची विजेती तेजस्वी प्रकाशनेसुद्धा तिचं मत मांडलं आहे. तेजस्वीनेही प्रियांका चहर चौधरीचं नाव घेतलं आहे. त्यामुळे बिग बॉसच्या चौदाव्या आणि पंधराव्या सिझनच्या विजेत्यांनी त्यांच्या मुलाखतीतून मोठी हिंट दिल्याची चर्चा रंगली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.