Bigg Boss 16: साजिद खान नॉमिनेट होताच वोटिंग लाइन केली बंद; भडकलेले नेटकरी म्हणाले..
'जावयाला पुन्हा वाचवलं'; बिग बॉसवर का भडकले प्रेक्षक?
मुंबई: बिग बॉस 16 च्या निर्मात्यांवर प्रेक्षक सुरुवातीपासूनच साजिद खानमुळे पक्षपातीचा आरोप करत आहेत. साजिद बिग बॉसच्या घरात सिगारेट पिऊ दे किंवा शिवीगाळ करू दे, त्याला काहीच म्हटलं जात नाही, अशी तक्रार प्रेक्षक करतात. या आठवड्यात घरातून बाहेर जाणाऱ्या स्पर्धकांमध्ये साजिदला नॉमिनेट करण्यात आलं. मात्र पुन्हा एकदा निर्मात्यांनी असं काही केलं की ज्यामुळे नेटकरी भडकले आहेत. बिग बॉसने पुन्हा एकदा जावयाला वाचवलं, असं नेटकरी म्हणत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन टास्क झाला. घराची कॅप्टन सौंदर्या शर्माकडे विशेष अधिकार होता की ती तीन नॉमिनेटेड सदस्यांना वाचवू शकली असती. साजिद खान, टीना दत्ता, शालीन भनोट, शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, अंकित गुप्ता आणि निम्रत कौर आहलुवालिया हे सदस्य नॉमिनेट झाले. सौंदर्याने तिच्याकडे असलेल्या विशेषाधिकाराचा वापर करत प्रियांका, अंकित आणि निम्रतला वाचवलं.
ज्याक्षणी नॉमिनेशनचा टास्क पूर्ण झाला, त्याच्या दुसऱ्याच क्षणी स्क्रीनवर मोठमोठ्या अक्षरात लिहिण्यात आलं की वोटिंग लाइन्स या आठवड्यात बंद असतील. यामुळे प्रेक्षक त्यांच्या आवडत्या स्पर्धकासाठी वोट करू शकत नाही. म्हणजेच यंदाचं एविक्शन हे मतांच्या आधारावर नसेल.
Congratulations guys Nomination is closed.#SajidKhan is saved for another week.#bb16 #biggboss pic.twitter.com/B1R32fJX0v
— Aujla Sahab ? (@aujlaSahab_) December 13, 2022
So now that #SajidKhan is finally nominated and we had a chance to not vote for him and throw the couch potato out of the house, these guys decided to “SWITCH OFF THE VOTING LINES FOR THE WEEK”!!!
Waah #BiggBoss16 waah! Kya baat hai tumlog ki.#BiggBoss@BiggBoss pic.twitter.com/EK6ousjYFm
— Keepin’ it real (@toodlesyalll) December 13, 2022
निर्मात्यांनी जाणूनबुजून वोटिंग लाइन्स बंद केले, असा आरोप नेटकरी करत आहेत. कारण साजिदला कमी मतं मिळतील हे त्यांना ठाऊक होतं. म्हणून त्याला वाचवण्यासाठी हा गेम करण्यात आला, असं नेटकरी म्हणाले. सोशल मीडियावर अनेकांनी यावरून राग व्यक्त केला.
Like I said long back, #SajidKhan will not get eliminated. Right @ColorsTV @VootSelect @BeingSalmanKhan @justvoot ? That’s why voting lines will not open this week. Shame, he will abuse Abdu even more now#StopBullyingAbdu
— Lady Khabri (@KhabriBossLady) December 13, 2022
साजिद खानवर ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत आरोप असल्याने त्याला शोमध्ये संधीच का दिली, यावरून आधीच प्रेक्षक नाराज आहेत. याशिवाय जेव्हापासून तो बिग बॉसच्या घरात आला आहे, तेव्हापासून तो मनमानी कारभार करत असल्याचंही अनेकांनी म्हटलंय.