Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ एका अटीनंतर Bigg Boss 16 फेम शिव ठाकरे कोणत्याही मुलीसोबत लग्न करण्यासाठी तयार

शिव ठाकरे लवकरच अडकणार विवाहबंधनात? चाहत्यांची मोठी संख्या असणाऱ्या शिव ठाकरे याला लग्नासाठी हवी अशी मुलगी... खुद्द शिव याने सांगितलं त्याला पत्नीमध्ये हवेत कोणते गुण

'या' एका अटीनंतर Bigg Boss 16 फेम शिव ठाकरे कोणत्याही मुलीसोबत लग्न करण्यासाठी तयार
shiv thakare
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 10:05 AM

bigg boss 16 fame shiv thakare : ‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16) चा दमदार स्पर्धक शिव ठाकरे (shiv thakare) शो संपल्यानंतर देखील तुफान चर्चेत असतो. बिग बॉसच्या घरात आपल्या स्वभावाने सर्वांना आपलसं करुण घेणाऱ्या शिव ठाकरे यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण शिवच्या चाहत्यांमध्ये तरुणींची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर शिवने एक पोस्ट केल्यानंतर त्याच्या फोटो किंवा व्हिडीओवर असंख्य मुली कमेंट करत शिववर असलेलं प्रेम व्यक्त करतात. एवढंच नाही तर अनेक मुलींनी शिवसोबत डेटवर जाण्याची देखील इच्छा व्यक्त केली आहेत. असंख्य तरुण मुलींनी शिवच्या चाहत्यांची यादी भरलेली असताना त्याने लग्नासाठी कशी मुलगी हवी यावर स्वतःची स्पष्ट भूमिका मांडली आहे. सध्या शिव त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. (shiv thakare roadies audition)

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत बिग बॉस स्पर्धक आणि परीक्षकांबद्दल शिवने अनेक गोष्टी सांगितल्या. एवढंच नाही तर लग्नासाठी कशी मुलगी आवडेल हे देखील शिव ठाकरे याने मुलाखतीत सांगितलं आहे. त्यामुळे लग्नासाठी शिवला कशी मुलगी हवी, हे त्याच्या चाहत्यांना देखील माहिती झालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

शिव ठाकरे याला विचारलं, तुला लग्न करायचं आहे? यावर शिव म्हणाला, ‘मला एका भारतीय मुलीसोबत लग्न करायचं आहे. ती कोणत्याही राज्यातील असली तरी मला काहीही फरक पडत नाही. मी कोणत्याही मुलीसोबत लग्न करण्यासाठी तयार आहे, ती फक्त भारतीय असायला हवी….’ अशी इच्छा होणाऱ्या पत्नीबद्दल शिव ठाकरे याने व्यक्त केली.

त्यामुळे शिव आता कधी लग्नबंधनात अडकेल आणि त्याची पत्नी कोण असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिव कायम त्याच्या खासगी आयुष्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी चाबहत्यांसोबत शेअर करत असतो. बिग बॉसच्या घरात देखील शिव त्याच्या मंडळींसोबत मजेत राहिला. शिवाय घरात होणाऱ्या वादांवर शिवने स्पष्ट भूमिका घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

बिग बॉस शोमध्ये खुद्द बिग बॉसने शिवचं कौतुक केलं. त्यानंतर शिव देखील प्रचंड भावुक झाला होता. बिग बॉस १६ ची ट्रॉफी शिव ठाकरे यांच्या नावावर नोंदवली जाईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. पण शेवटच्या क्षणी अभिनेता आणि शोचा होस्ट सलमान खान (salman khan) याने एमसी स्टॅन (Mc stan) याला विजेता म्हणून घोषित केलं.

एमसी स्टॅन विजयी ठरल्यानंतर शिवने देखील स्टॅनचं कौतुक केलं. बिग बॉसनंतर शिव दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या ‘खतरो के खिलाडी १३’ मध्ये दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर, शिव सिनेमातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.