Bigg Boss 16: “ती माझी मुलगी नाही” म्हणत सुंबुलच्या वडिलांनी केली मोठी मागणी; काय होणार पुढे?

लाडक्या लेकीला 'बिग बॉस'च्या घरात पाठवल्याचा पश्चात्ताप; वडिलांची मागणी होणार का पूर्ण?

Bigg Boss 16: ती माझी मुलगी नाही म्हणत सुंबुलच्या वडिलांनी केली मोठी मागणी; काय होणार पुढे?
सुम्बुल, शालीनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 10:19 AM

मुंबई: ‘बिग बॉस 16’ घरात दररोज नवीन ड्रामा पहायला मिळतो. ‘ईमली’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुंबुल तौकीर खान, अभिनेता शालिन भनोत आणि ‘उतरन’ फेम टीना दत्ता यांच्या प्रेमाचा त्रिकोण प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतोय. मात्र हे सर्व पाहून सुंबुलच्या वडिलांना खूप वाईट वाटतंय. “बिग बॉसच्या घरात वावरणारी ती माझी मुलगीच नाही”, असंच थेट त्यांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढण्यासाठी मतं द्या, अशी विनंती त्यांनी चाहत्यांना केली आहे.

बिग बॉसच्या घरात सुंबुल, शालिन आणि टीना यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. त्यानंतर सुंबुलला तिच्या वडिलांशी फोनवर बोलण्याची संधी देण्यात आली होती. तिच्या आणि शालिनच्या नात्याबद्दल बाहेर होत असलेल्या चर्चा त्यांनी सुंबुलला सांगितल्या. त्याचसोबत शालिन आणि टीनाला धडा शिकव, असा सल्ला त्यांनी मुलीला दिला.

हे सुद्धा वाचा

एका मुलाखतीत सुंबुलचे वडील टीना आणि शालिनला ‘कमीने’ असं म्हणाले. यानंतर त्यांच्यावरही टीका झाली. याबद्दल माफी मागण्यास तयार असलेले सुंबुलचे वडील नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले, “मी सुंबुलला अत्यंत सुरक्षित वातावरणात लहानाचं मोठं केलं. जेव्हा बिग बॉसची ऑफर आली, तेव्हा तिला ‘दुनियादारी’ कळावी म्हणून ही चांगली संधी असेल असं मला वाटलं होतं. मी किंवा सुंबुलने याआधी कधीच हा शो पाहिला नव्हता. त्यात असं काही होईल हेसुद्धा आम्हाला माहीत नव्हतं. मी माझ्या मुलीला बिग बॉसच्या घरात पाठवल्याचा मला पश्चात्ताप होतोय. तिची मदत करण्याऐवजी मी तिला दुखावलंय.”

“तिच्यावर प्रेम करणारे चाहते अजूनही आहेत, पण मला वाटतं घरातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. त्या घरात वावरणारी माझी मुलगी नाही. तिने तिचा आनंद आणि सकारात्मकता गमावली आहे. तिने आणखी कुठल्या त्रासातून जावं, अशी माझी इच्छा नाही. त्यामुळे मी चाहत्यांना विनंती करतो की तिला वोट करू नका. या शनिवारी ती घरातून बाहेर पडू दे अशी मी प्रार्थना करतोय”, असं त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.