‘बिग बॉस’मध्ये १९ आठवड्यांसाठी एमसी स्टॅन याने घेतलं इतक्या कोटींचं मानधन
‘बिग बॉस १६’ च्या घरात फक्त १९ आठवड्यांमध्ये एनसी स्टॅन झाला मालामाल... एका आठवड्यासाठी रॅपरने घेतलं इतक्या रुपयांचं मानधन
Bigg Boss 16 Winner MC Stan : छोट्या पडद्यावरचा सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस १६’ आता संपला आहे. रविवारी अभिनेता आणि शोचा होस्ट सलमान खान (salman khan) याने मोठ्या उत्साहात ‘बिग बॉस १६’ चा विजेता घोषित केला आणि चाहत्यांना चक्क केलं. ‘बिग बॉस १६’ विजेता म्हणून सलमान याने एमसी स्टॅन (MC Stan) याचं नाव घोषित केलं. ‘बिग बॉस १६’ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर एमसी स्टॅन याच्या चेहऱ्यावरील आनंद फार वेगळा होता. ‘बिग बॉस १६’ च्या घरातील एमसी स्टॅनचा प्रवास फार चकित करणारा होता. सध्या एमसी स्टॅन त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे.
एमसी स्टॅन मुळचा पुण्याचा आहे. पुण्यात एमसी स्टॅन एका बस्तीमध्ये राहायचा. त्याच्या आयुष्यात अनेक वाद होते. एमसी स्टॅन याच्या गाण्यांमुळे देखील अनेक वाद रंगले. पण बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅन याच्या चेन आणि ड्रेसिंग स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधलं. सांगायचं झालं तर, बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅन ८० हजार रुपयांचे बूट आणि दीड कोटी रुपयांची चेनची तुफान चर्चा रंगली. अनेकदा सलमान खान याने देखील एमसी स्टॅन याच्या लाईफ स्टाईलवर वक्तव्य केलं.
View this post on Instagram
‘बिग बॉस १६’ च्या घरात फक्त १९ आठवड्यांच्या प्रवासात एनसी स्टॅन याने मित्रांची साथ सोडली नाही. शोमध्ये मित्रांच्या मदतीने आणि जिद्दीने एमसी स्टॅन याने स्वतःचं स्थान भक्कम केलं. शोमध्ये एमसी स्टॅन याने अनेक चढ-उतार पाहिले. शोमध्ये एमसी स्टॅन हसला, निराश झाला… पण टॉप ५ पर्यंत जाण्यासाठी एमसी स्टॅन याने पूर्ण प्रयत्न केलं आणि विजयी ठरला. (bigg boss 16 winner mc stan photo)
विजेता म्हणून एमसी स्टॅन याला ३१ लाख ८० हजार रुपये आणि एका कार मिळाली आहे. एवढंच नाहीतर ‘बिग बॉस १६’ च्या घरात फक्त १९ आठवड्यांमध्ये एनसी स्टॅन झाला मालामाला आहे. कारण एक आठवड्यासाठी एमसी स्टॅम मोठी रक्कम घेत होता. एमसी स्टॅन एका आठवड्यासाठी ७ लाख रुपये मानधन घेत असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
अशाप्रकारे १९ आठवड्यांसाठी एमसी स्टॅन याने तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांचं मानधन घेतलं आहे. सध्या सर्वत्र रॅपरची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार एमसी स्टॅन याची एकुण संपत्ती जवळपास १६ कोटी रुपये आहे. एमसी स्टॅन त्याच्या रॅपर कॉन्सर्टच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.