Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस’नंतर एमसी स्टॅनचं नशीबच पालटलं; शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

‘बस्ती का हस्ती’ म्हणून लोकप्रिय झालेला ‘बिग बॉस 16’चा विजेता एमसी स्टॅनला आता विविध शोजचे ऑफर्स मिळू लागले आहेत. मार्च महिन्यात त्याचे एकानंतर एक रॅप शोजसुद्धा होणार आहेत. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तो सक्सेस पार्टी आणि गेट-टुगेदरमध्ये दिसला.

'बिग बॉस'नंतर एमसी स्टॅनचं नशीबच पालटलं; शाहरुख खानच्या 'या' चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 10:56 AM

मुंबई : बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो मानला जातो. या शोमध्ये भाग घेणाऱ्या अनेक स्पर्धकांचं नशीब पालटलं. त्यात आता रॅपर एमसी स्टॅनचाही समावेश झाला आहे. एमसी स्टॅनने बिग बॉसचा सोळावा सिझन जिंकला आहे. हा शो जिंकल्यानंतर त्याचंही नशिब पालटलं आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याची लोकप्रियता तुफान वाढली आहे. आपल्या पहिल्या पोस्टद्वारे आणि इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे त्याने आधीच विक्रम रचला. या लोकप्रियतेच्या बाबतीत त्याने काही मोठमोठ्या सेलिब्रिटींनाही मागे टाकलं आहे. आता एमसी स्टॅनला खूप मोठी ऑफर मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

गायन क्षेत्रातनंतर आता एमसी स्टॅन अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावणार आहे. तो लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला मोठा ब्रेक मिळाला आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या आगामी चित्रपटातील भूमिकेची ऑफर त्याला मिळाल्याचं कळतंय. शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटातील ही भूमिका आहे.

हे सुद्धा वाचा

एमसी स्टॅनच्या चाहत्यांसाठी ही सर्वांत आनंदाची बातमी आहे. कारण बॉलिवूडच्या ‘पठाण’सोबत तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र याबद्दल एमसी स्टॅनकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. मात्र या चित्रपटात तो अभिनय नव्हे तर रॅप करणार आहे, असंही काहींचं म्हणणं आहे. त्यामुळे एमसी स्टॅनला अभिनयाची ऑफर मिळाली आहे की गायनाची, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर एमसी स्टॅनने शाहरुख खानाही रेकॉर्ड मोडला होता. इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत त्याने मोठमोठ्या सेलिब्रिटींचे विक्रम मोडले होते. यात विराट कोहलीसह शाहरुखचाही समावेश होता. सोशल मीडियावर एमसी स्टॅनचा मोठा चाहतावर्ग आहे. याची प्रचिती नेटकऱ्यांना यानिमित्ताने आली.

एमसी स्टॅनचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या सहा महिन्यांत इन्स्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या जवळपास 400 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचे फॉलोअर्स 1.8 दशलक्षांवरून 9.1 दशलक्षांवर गेले आहेत. बिग बॉस 16 जिंकल्यानंतर अवघ्या 48 तासांत जवळपास 20 ब्रँड्सनी करारासाठी एमसी स्टॅनशी संपर्क साधल्याचीही माहिती समोर येत आहे.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.