एक्स बॉयफ्रेंड पंड्यावर भडकली ऐश्वर्या.. म्हणाली ‘लाज वाटली पाहिजे तुला..’

अभिनेत्री ऐश्वर्या शर्माचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. ईशा मालवीयमुळे ऐश्वर्याला घराबाहेर पडावं लागलं. आता बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना ऐश्वर्या तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर चांगलीच भडकली. तुला लाज वाटली पाहिजे, मी आता विवाहित आहे, असं ती म्हणाली.

एक्स बॉयफ्रेंड पंड्यावर भडकली ऐश्वर्या.. म्हणाली 'लाज वाटली पाहिजे तुला..'
Aishwarya Sharma and Rahul PandyaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 25, 2023 | 1:35 PM

मुंबई : 25 डिसेंबर 2023 | ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा नुकतीच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. ‘बिग बॉस 17’मध्ये ऐश्वर्याने पती नील भट्टसोबत भाग घेतला होता. मात्र बिग बॉसच्या घरातील तिचा प्रवास लवकरच संपुष्टात आला. आता बाहेर आल्यानंतर ‘टीव्ही 9 हिंदी डिजिटल’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ऐश्वर्याने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला चांगलंच सुनावलं. टीव्ही अभिनेता नील भट्टशी लग्न करण्यापूर्वी ती राहुल पंड्याला डेट करत होती. ऐश्वर्याने बिग बॉसच्या घरात असताना केलेला माझा उल्लेख अजिबात आवडला नसल्याचं त्याने एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना ऐश्वर्या राहुलवर चिडली.

ऐश्वर्या म्हणाली, “हे काय नाटक आहे? कारण माझं आणि राहुलचं ब्रेकअप 2014 मध्येच झालं होतं. त्याचा ॲटिट्यूडच आमच्या ब्रेकअपचं कारण होतं. मी अभिनय क्षेत्रात काम करणं सोडून दिलं पाहिजे, असं तो मला म्हणायचाय. मी का सोडू ॲक्टिंग? मी अभिनेत्री बनायला आली आहे तर साहजिकच मी अभिनय करेन. त्याने अजूनही बरंच काही म्हटलं होतं. ते मी इथे मुलाखतीत सांगूही शकत नाही. म्हणूनच मी त्याच्याशी ब्रेकअप केला होता. आमचं नातं त्याच वेळी संपुष्टात आलं होतं.”

हे सुद्धा वाचा

याविषयी बोलताना ऐश्वर्याने राहुलला काही प्रश्न विचारले. “आता तू कोणत्या रिलेशनशिपबद्दल बोलतोय? मी बिग बॉसच्या शोमध्ये कधीच तुझ्याबद्दल बोलले नव्हते. तुझ्यानंतरसुद्धा माझ्या आयुष्यात दुसरी लोकं आली होती. तुझ्याशी ब्रेकअप झाल्यानंतर मी दुसऱ्या व्यक्तीलाही डेट केलं होतं. तू असा एकटाच नव्हतास, ज्याच्यासोबत मी रिलेशनशिपमध्ये होती. त्यामुळे माझं नाव घेणं बंद कर. आतातरी मोठा हो. तुला खरंच लाज वाटली पाहिजे. मी विवाहित आहे.”

काय म्हणाला होता राहुल?

“तिने बिग बॉसच्या घरात माझ्याविषयी बरंच काही सांगितलंय, जे मला अजिबात आवडलं नाही. मला बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी मिळाली तर सर्वकाही स्पष्ट करू शकेन. माझ्याकडे तिच्याविरोधात सर्व पुरावे आहेत आणि मी ते सर्व दाखवू शकतो. लोक मला येऊन बोलतायत की तुझी एक्स गर्लफ्रेंड बिग बॉसच्या घरात सतत तुझा उल्लेख करून अपमान करतेय. तू तिला पुढे जाण्यास नेहमीच मदत केली होतीस, तरी ती तुझ्याबद्दल हे सर्व बोलतेय”, असं राहुल म्हणाला होता.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.