Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेकडून बेबी प्लॅनिंगविषयी खुलासा; ‘बिग बॉस’मध्ये सांगितलं कधी देणार गुडन्यूज?

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अंकिता लोखंडेचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट पहायला मिळाला. तेव्हापासूनच तिच्या गरोदरपणाची चर्चा सुरू झाली. आता बिग बॉसच्या घरात अंकिताने स्वत: बेबी प्लॅनिंगविषयी खुलासा केला आहे.

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेकडून बेबी प्लॅनिंगविषयी खुलासा; 'बिग बॉस'मध्ये सांगितलं कधी देणार गुडन्यूज?
Ankita Lokhande, Vicky JainImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 9:50 AM

मुंबई : 19 ऑक्टोबर 2023 : सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोचा सतरावा सिझन नुकताच सुरू झाला आहे. या नव्या सिझनमध्ये 17 स्पर्धक बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहेत. अगदी पहिल्या दिवसापासूनच हा शो तुफान चर्चेत आहे. दिल-दिमाग आणि दम अशा तीन विभागांमध्ये स्पर्धकांना विभागलं गेलं आहे. विशेष म्हणजे यावेळी बिग बॉसच्या घरात कपल्सचीही एण्ट्री झाली. त्यामुळे शोमध्ये खासगी गोष्टींबद्दल चर्चा होणं स्वाभाविक आहे. अंकिता लोखंडे ही या सिझनची सर्वांत महागडी स्पर्धक असल्याचं म्हटलं जात आहे. पती विकी जैनसोबत ती बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहे. बिग बॉसच्या घरात जाण्याआधीपासूनच अंकिताच्या प्रेग्नंसीची जोरदार चर्चा होती. आता बिग बॉसमध्ये तिने बेबी प्लॅनिंगविषयी खुलासा केला आहे.

‘बिग बॉस 17’च्या लाइव्ह फीडमधून अंकिताच्या बेबी प्लॅनिंगविषयीची माहिती समोर आली आहे. ‘बिग बॉस तर’ या ट्विटर अकाऊंटवर सांगितलं गेलंय की, अंकिता आणि विकीने बेबी प्लॅनिंग कधी करणार, याविषयीची माहिती घरातील इतर स्पर्धकांना दिली आहे. हे दोघं पुढच्या वर्षी बेबी प्लॅनिंग करणार आहेत. अंकिता आणि विकी घरातील गार्डन एरियामध्ये बसले होते आणि यादरम्यान ती म्हणते, “मी इथे फक्त विकीमुळे आली आहे. तो नेहमी हा शो पहायचा आणि यात सहभागी होण्याची त्याची खूप इच्छा होती.”

हे सुद्धा वाचा

यावेळी अंकिता तिच्या बेबी प्लॅनिंगविषयीही बोलू लागते. या वर्षी बिग बॉसमध्ये सहभागी झाल्याने पुढच्या वर्षी बेबी प्लॅनिंग करू शकतो, असं ती म्हणाली. विकी जैनने नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री मन्नारा चोप्राशी पंगा घेतला. या कारणामुळे विकीला नॉमिनेट करण्यात आलं आहे.

एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेनं 14 डिसेंबर 2021 रोजी बॉयफ्रेंड विकी जैनशी लग्नगाठ बांधली. लग्न झाल्यापासून तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सतत सोशल मीडियावर होत आहेत. मध्यंतरीच्या काळात अंकिताचे मॉर्फ केलेले फोटोसुद्धा व्हायरल झाले. या मॉर्फ केलेल्या फोटोंमध्ये अंकिताचा बेबी बंप पहायला मिळाला आणि त्यावरून ती गरोदर असल्याची चर्चा होऊ लागली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.