Bigg Boss 17 : अरबाज खान – सोहैल खानने स्वत:च्याच लग्नाची उडवली खिल्ली; म्हणाले..

मिळालेल्या माहितीनुसार आता अरबाज आणि सोहैल हे दोघं मिळून दर रविवारी बिग बॉसचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. शुक्रवार आणि शनिवार यादिवशी सलमान कार्यक्रमात दिसेल आणि रविवारी त्याची दोघं भावंडं मिळून कार्यक्रमाची सूत्रे हाताळतील.

Bigg Boss 17 : अरबाज खान - सोहैल खानने स्वत:च्याच लग्नाची उडवली खिल्ली; म्हणाले..
Sohail and Arbaaz Khan with ex wivesImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 30, 2023 | 9:46 AM

मुंबई : 30 ऑक्टोबर 2023 | सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘बिग बॉस 17’ हा शो तिसऱ्या आठवड्यात पोहोचला आहे. मात्र त्याआधी दुसऱ्या आठवड्याअखेर ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये एक वेगळीच धमाल प्रेक्षकांना पहायला मिळाली. वीकेंड का वार एपिसोड्सचं सूत्रसंचालन नेहमी सलमानच करतो. त्याच्यासोबत इतर पाहुण्यांची शोमध्ये एण्ट्री होते. यंदाच्या एपिसोडमध्ये सलमानचे दोन्ही भाऊ म्हणजेच अरबाज खान आणि सोहैल खान यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे ते फक्त पाहुणे म्हणूनच उपस्थित नव्हते, तर त्यांनी शोचं सूत्रसंचालनसुद्धा केलं आहे. यादरम्यान दोघांचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळाला. स्पर्धकांशी गप्पा मारता मारता अरबाज आणि सोहैलने स्वत:च्याच लग्नाची खिल्ली उडवली. त्याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये अरबाज आणि सोहैल हे दोघं बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांसमोर आपली ओळख करून देत असतात. “हम यहां आए है, आपके खिलाफ करने मुकदमा, जिसे अगर आप प्रूफ नहीं कर पाए तो लगेगा सदमा.” यानंतर ‘खान’ भावंडं स्पर्धकांची मस्करी करताना दिसतात. सोहैल विचारतो, “यहां पर सबसे मंझा हुआ खिलाडी कौन है?” त्यावर अरबाज म्हणतो, “मंझा नहीं पता लेकिन बंधा हुआ एक खिलाडी है जिसका नाम नील है. ऐश्वर्या नीलने सबको बांधा हुआ है.”

हे सुद्धा वाचा

अरबाज आणि सोहैल हे बिग बॉसच्या घरातील विवाहित जोडप्यांवर निशाणा साधतात. अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन याचीही ते खिल्ली उडवतात. त्यानंतर सोहैल म्हणतो, “पती-पत्नींमधील भांडणं सोडवण्यासाठी आमच्याकडे कोणतेच टीप्स नाहीत.” त्यावर अरबाज हसत म्हणतो, “आपल्या दोघांकडे?” हे ऐकून सोहैल अरबाजला म्हणतो, “आपली सध्याची परिस्थिती बघता, त्या हिशोबाने आपण कोणतेच टीप्स नाही दिले पाहिजेत.” हे ऐकून सर्वांनाच हसू अनावर होतं.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

अरबाज खान आणि मलायका अरोराने 2017 मध्ये एकमेकांना घटस्फोट दिला. तर सोहैल खानसुद्धा पत्नी सीमा सजदेहपासून विभक्त झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं वेगवेगळे राहत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी घटस्फोटासाठी अर्जसुद्धा केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.