‘बिग बॉस 17’मधील स्पर्धकांना डबल झटका; आयेशा खानसोबत संपला या स्पर्धकाचा प्रवास

'बिग बॉस 17' हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या 28 जानेवारी रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यापूर्वी बिग बॉसच्या घरातून दोन स्पर्धक बाहेर पडले. आयेशा खाननंतर आणखी एका स्पर्धकाचा बिग बॉसमधील प्रवास संपला.

'बिग बॉस 17'मधील स्पर्धकांना डबल झटका; आयेशा खानसोबत संपला या स्पर्धकाचा प्रवास
Bigg Boss 17 contestantsImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 8:11 AM

मुंबई : 20 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’चा ग्रँड फिनाले जसजसा जवळ आला आहे, तसतसं घरात आश्चर्यकारक गोष्टी घडत आहेत. गेल्या आठवड्यात स्पर्धकांमध्ये एक टास्क पार पडला. हा टास्क जिंकणाऱ्या टीममधील चार जण सुरक्षित झाले आणि ते थेट फिनाले वीकमध्ये पोहोचले. मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी आणि मन्नारा चोप्रा यांचा त्यात समावेश आहे. तर दुसऱ्या टीममधील चार जण एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले. विकी जैन, अंकिता लोखंडे, आयेशा खान आणि ईशा मालवीय यांच्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार होती. हा अखेरचा ‘वीकेंड का वार’ असल्याने या आठवड्यात एक ऐवजी दोन स्पर्धकांना बेघर करण्यात आलं. आयेशा खाननंतर आता आणखी एका स्पर्धकाला बिग बॉसच्या घराबाहेर काढण्यात आलं आहे.

बिग बॉसने घरात काही चाहत्यांना बोलावलं. त्यानंतर एकेका स्पर्धकाने चाहत्यांसमोर इतर सदस्यांना रोस्ट केलं. अखेर बिग बॉसने घरात आलेल्या चाहत्यांना अधिकार दिला की त्यांच्या मतांच्या आधारे एका सदस्याला घराबाहेर काढलं जाईल. चाहत्यांनी वोटिंग केल्यानंतर सर्वांत आधी आयेशा खान घराबाहेर गेली. आयेशा बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एण्ट्रीने आली होती. तिच्या नावावर आधीपासून अंदाज बांधले जात होते. त्यानंतर बिग बॉसने डबल एविक्शन करत सर्वांना झटका दिला. आयेशा खाननंतर ईशा मालवीयचा बिग बॉसमधील प्रवास संपला.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

ईशा मालवीयचं एलिमिनेशन अनेकांसाठी आश्चर्यकारक होतं. कारण सोशल मीडियावर विविध पोलिंगनुसार विकी जैनला घराबाहेर जाण्यासाठी अधिक मतदान करण्यात आलं होतं. आयेशानंतर त्याच्याच नावाची चर्चा होती. मात्र विकीच्या ऐवजी ईशाला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं. आयेशा खान आणि ईशा मालवीय यांच्या एलिमिनेशननंतर आता शोमध्ये मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे स्पर्धक राहिले आहेत.

‘बिग बॉस 17’चा ग्रँड फिनाले येत्या 28 जानेवारी रोजी पार पडणार आहे. यादिवशी सहा स्पर्धकांमध्ये ट्रॉफीसाठी चुरस रंगणार आहे. विजेत्याच्या शर्यतीत सध्या मुनव्वर, अभिषेक आणि अंकिता सर्वांत पुढे आहेत. या तिघांपैकी कोणीतरी एक ट्रॉफी जिंकू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.