Bigg Boss 17 : ‘संपवू सगळं काही…’, अंकिता हिने तोडलं विकीसोबत नातं? म्हणाली, ‘चुकीचं लग्न…’
Ankita Lokhande : लवकरच होणार अंकिता लोखंडे - विकी जैन यांचा घटस्फोट? रडत अंकिता म्हणाली, 'तुझ्यासमोर माझी लेवल....', पुन्हा विकी याने असं काय केलं, ज्यामुळे ढसाढसा रडू लागली अंकिता? सर्वत्र दोघांच्या नात्याची चर्चा...
मुंबई | 19 जानेवारी 2024 : अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. ‘बिग बॉस 17’ च्या पहिल्या दिवसापासून अंकिता – विकी यांच्यात वाद होत आहेत. शोचा फिनाले आता जवळ आला आहे तरी देखील अंकिता – विकी मिटलेले नाही. याचा दोघांच्या नात्यावर देखील गंभीर परीणाम होताना दिसत आहे. लेटेस्ट एपिसोडमध्ये देखील पुन्हा अंकिता – विकी यांच्या मोठं भांडण झालं आणि अंकिता हिने सर्व काही संपलं असल्याचं वक्तव्य केलं… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता – विकी यांची चर्चा रंगली आहे.
अंकिता आणि ईशा गार्डनमध्ये मन्नारा चोप्रा हिच्याबद्दल बोलत होते. तेव्हा विकी देखील गार्डनमध्ये आला आणि म्हणाला, ‘हजार वेळा यावर बोलून झालं आहे आणि आता मला याचा कंटाळा आला आहे.’ विकी याला ईशा – अंकिता सांगतात मन्नारा चुकीची आहे आणि तू तिची बाजू घेऊ नकोस… अंकिता पुन्हा ईशासोबत बोलायला सुरुवाते. तेव्हा विकी जोर-जोरात हसू लागतो…
विकीची वागणूक अंकिताला आवडत नाही आणि अभिनेत्री रडू लागते… तेव्हा ईशा देखील अंकिता हिला समजवायला अंकिताच्या खोलीत आली. विकी देखील पत्नीला विचारु लागला, ‘अशी का वागत आहेस?’ यावर अंकिता म्हणाली, ‘तू सतत माझ्यावर हसत असतोस… मी चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे… ‘
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘प्रत्येक ठिकाणी फक्त मला अडवत असतो… टोकत असतो… असं करु नकोस… मी बोलू देखील शकत नाही. माझ्यातील आत्मविश्वास आता संपत आहे. मला माफ कर… आता आपण बोलायचं नाही, सर्व काही संपलं आहे. मला तुझ्यासोबत नाही चांगलं वाटत…’
पुढे अंकिता म्हणाली, ‘मी माझं मत देखील कोणासमोर मांडू शकत नाही. मझ्याकडून आता नाही होणार… मला आता सर्वकाही कळलं आहे. तू माझ्या लेवलच्या खूप वर आहेस. तूझ्यासमोर मी काहीही नाही… ही गोष्ट फक्त आजची नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हेच सर्वकाही सुरु आहे.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विकी आणि अंकिता यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.