‘रोज रात्री माईक काढून…’, घटस्फोटाची धमकी, पतीवर संशय, फेक आहेत अंकिता – विकी यांच्यातील भाडणं?
Bigg Boss 17 : 'रोज रात्री माईक काढून...', अंकिता लोखंडे - विकी जैन यांचं सुरु तरी काय? स्पर्धकाकडून मोठा खुलासा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विकी जैन आणि अंकिता लोखंडे याच्या नात्याची चर्चा....
Bigg Boss 17 : अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन यांचे वाद चव्हाट्यावर आले आहेत. ‘बिग बॉस 17’ मध्ये सतत विकी आणि अंकिता यांच्यामध्ये वाद होताना दिसत आहे. फक्त वाद नाही तर विकी – अंकिता यांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे. बिग बॉस संपल्यानंतर विकी – अंकिता यांच्या नात्याचं काय होणार? यावर देखील अनेक चर्चा रंगल्या आहे. एवढंच नाही तर, अंकिता हिच्या सासूबाईंनी देखील अभिनेत्रीवर अनेक आरोप केले. तर अंकिता हिच्या आईने मात्र लेकी बाजू सर्वांसमोर मांडली. बिग बॉसमुळे सर्वत्र विकी – अंकिता यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे. पण चाहत्यांमध्ये मात्र कपल फक्त नाटक करतं… अशी चर्चा आहे.
अशात ‘बिग बॉस 17’ स्पर्धक अभिषेक कुमार याने विकी-अंकिता यांच्या नात्याचं मोठं सत्य चाहत्यांना सांगितलं आहे. बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये अभिषेक आणि अरुण महाशेट्टी विकी-अंकिता यांच्याबद्दल बोलत होते. तेव्हा विकी-अंकिता यांच्यातील वाद फेक आहेत… असं अभिषेक म्हणाला.
पुढे अभिषेक म्हणाला, ‘मी सांगतो दोघांमध्ये काय होतं. दोघं रोज रात्री माईक काढून रोज रात्री चादरीत बोलत असतात. उद्या काय करायचं… यावर दोघं योजना तयार करत असतात. मी तुला असं सर्व काही बोलेले. ज्यामुळे तुला गेममध्ये अव्वल स्थानी राहाता येईल. कारण विकी भाई याला मााहिती आहे, तो काही जिंकणार नाही.’
‘मी नाही जिंकलो तरी चालेल, पण माझी पत्नी जिंकली पाहिजे… असा विकी याचा प्रयत्न आहे.’ महत्त्वाचं म्हणजे अभिषेक यांच्या वक्तव्यावर अरुण याने देखील सहमती दर्शवली… फक्त अरुण यानेच नाही तर, अनेकांनी अभिषेक याच्या वक्तव्यावर सहमती दर्शवली आहे. सध्या सर्वत्र अभिषेक याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
एक व्यक्ती अभिषेक याच्या वक्तव्यावर म्हणाला, ‘दोघे देखील भांडण्याचं नाटक करत आहेत….’ दुसरा व्यक्ती म्हणाला, ‘अभिषेक याने विकी-अंकिता यांचं पितळ उघडं केलं आहे.’ तर यावर अंकिता हिच्या चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘जो स्वतः प्रसिद्धीसाठी भांडणं करतो…. सतत ओरडत असतो…सहानुभूति मिळवतो… हा कोण आहे दोघांना बोलणारा…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता लोखंडे, विकी जैन आणि अभिषेक कुमार यांची चर्चा रंगली आहे.